सामाजिक

स्व. प्रफुल्ल दळवी यांच्या जन्मदिनानिमित्त देवळाली प्रवरात रक्तदान शिबिर संपन्न

देवळाली प्रवरा : शहरातील विश्वकर्मा चौक येथे मंगळवार दि.१६ नोव्हेंबर रोजी स्व. प्रफुल्ल दळवी यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व जनकल्याण रक्तकेंद्र अहमदनगर यांच्या माध्यमातून रक्तदान शिबिर पार पडले. या शिबिरात जवळपास ३८ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सामाजिक कार्यात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला.
या शिबिरास नगराध्यक्ष सत्यजीत कदम, नगरसेवक सचिन ढुस, उद्योजक सतीश वाळुंज, उद्योजक सचिन कोठूळे, शिवसेना शहराध्यक्ष सुनिल कराळे, आझाद मित्र मंडळाचे अध्यक्ष संदीप कदम, मोहसीन शेख, अजिंक्य कदम आदि उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वीतेसाठी सचिन कोठुळे, मंगेश ढुस, रवींद्र दळवी, अक्षय कडू, संजय राऊत, अक्षय गाडेकर, लखन गाडेकर,निलेश राऊत, विशाल राऊत, जनकल्याण रक्तपेढीचे डॉ.गुप्ता तसेच विश्वकर्मा प्रतिष्ठान व स्व.प्रफुल्ल दळवी मित्र परिवार आदीनी परिश्रम घेतले.

Related Articles

Back to top button