ठळक बातम्या
नगर येथे पेन्शनधारकांचे निषेध आंदोलन
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : राष्ट्रीय संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली अहमदनगर येथील प्राव्हीडंड फंडाच्या कार्यालयावर निषेध सभा व २९ डिसेंबर २०२२ चे परिपत्रकाची होळी करण्यासाठी जिल्ह्यातून तिनशेच्या वर पेन्शनर उपस्थित होते. त्यांना जिल्हाध्यक्ष संपत समिंदर, उपाध्यक्ष एस के सय्यद, शहराध्यक्ष संजय मुनोत, श्रीगोंदा तालुकाध्यक्ष भगवंत वाळके, आप्पा नागरे यांनी संबोधित केले.
यावेळी अहमदनगर येथील सहाय्यक कमिशनर श्रीमती जाधव यांना निवेदन देण्यात आले व 29 डिसेंबर चे परिपत्रकाची होळी करण्यात आली. सरकारने मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्यात अन्यथा पेन्शन धारकांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशारा देण्यात आला. नेवासा तालुकाध्यक्ष बापूराव बहिरट, सुकदेव पाटील आहेर, हौसराज राजळे यांच्यासह जिल्ह्यातील सर्व प्रमुख पदाधिकारी व पेन्शनर मोठ्या संख्येने उपस्थित होते.