अहिल्यानगर

प्रहार दिव्यांग संघटनेच्या अध्यक्षपदी क्षीरसागर तर उत्तर नगर जिल्हा संघटकपदी पठाण

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर प्रहार दिव्यांग संघटना तालुका अध्यक्ष पदी सचिन अंबादास क्षीरसागर तर जिल्हा संघटक पदी गुलाब पठाण तसेच श्रीरामपूर शहर अध्यक्ष अमोल झांबरे, महिला तालुका अध्यक्ष पदी श्रीमती मायाताई इंगळे यांची निवड करण्यात आली.
श्रीरामपूर येथील लोक मान्य टिळक वाचनालय येथे भारत मातेचे पुजन करून दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रहार ची नवीन तालुका कार्यकारिणी संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत प्रमुख अतिथी म्हणून मेजर पंकज आढाव, उत्तर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे, जय बाबा वर्तमान पत्राचे संपादक मनोज आगे, माजी नगरसेवक नागेश सावंत, राहुरी तालुका सल्लगार सलीमभाई शेख आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे अध्यक्षपदी ह.भ.प. नानासाहेब शिंदे महाराज होते.
यावेळी नागेश सावंत यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, ज्या प्रमाणे महाराष्ट्रात दिव्यांगाच्या हक्का लढणारे आमदार बच्चु कडू आहेत. त्यांच्या सारखे दिव्यांगासाठी चांगले काम करणे गरजेचे आहे. आगे यांनी आपल्या मनोगतात सांगितलेे की, या दिव्यांगांसाठी कोणतेही सहकार्य लागेेल ते सहकार्य निश्चित केले जाईल. चांगल्या कामाची प्रसिद्धी केली जाईल. उत्तर अहमदनगर जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी सांगितले की, दिव्यांगांच्या शासकीय योजना प्रत्येक गावातील दिव्यांगांपर्यंत गेली पाहिजे. दिव्यांग स्वतंत्र मंत्रालय महाराष्ट्रात होत आहेे, ते देशातील पहिले मंत्रालय असून यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिव्यांग हृदय सम्राट माजी राज्यमंत्री बच्चु भाऊ कडू यांचे मनापासून आभार मानले. श्रीरामपूर तालुक्यात गाव तिथे प्रहार दिव्यांग संघटनेची शाखा स्थापन करून गावातील दिव्यांंगांचे प्रश्न सोडवले पाहिजे. त्याच प्रमाणे राहुरी तालुका समन्वयक ह.भ.प.नानासाहेब शिंदे महाराज यांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले दिव्यांगांच्या अडचणी शिबिराच्या माध्यमातून सोडवले पाहिजे म्हणजे एकाच वेळी जास्त दिव्यांगांचे प्रश्न सुटतील.
यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्यांना नियुक्ती पञ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीरामपुर तालुका प्रहार संघटनेने उपस्थित सर्व प्रहार पदाधीकारी व पञकार यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष सचिन क्षीरसागर यांनी आभार मानले. या कार्यक्रमासाठी तालुक्यातील दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोरख जाधव, आनंद मोरे, शशांक ताम्हाणे, सुनिल कानडे, मोसिम भाई बागबान, दांडगे आदींनी प्रयत्न केले.

Related Articles

Back to top button