अहिल्यानगर
उंदीरगाव ग्रामपंचायतीला प्रथम स्मार्ट ग्राम पुरस्कार
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील उंदीरगाव ग्रामपंचायतीस सन २०२१-२२ माजी गृहमंत्री स्व.आर आर [आबा] पाटील यांच्या नावाने दिला जाणारा मानाचा आर आर पाटील स्मार्ट ग्राम पुरस्कार अहमदनगर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी १४ ग्रामपंचायतींना जाहीर केले असून उंदीरगाव ग्रामपंचायतीस तालुकास्तरीय प्रथम क्रमांक मिळाला असून विभागून व मानचिन्हाने सन्मानित करण्यात आले आहे अशी माहिती माजी चेअरमन सुरेश पा. गलांडे यांनी दिली.
उंदीरगाव ग्रामपंचायतीस ७० वर्षे पूर्ण झाली असून रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होत आहे. त्यानिमित्त पुरस्कार प्राप्त झाला आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षात गावात सुशोभीकरण, भूमिगत गटारी, ओपन जिम, आरो फिल्टर पाण्याचे बसविण्यात आले आहेत. अंगणवाडी इमारत, जलजीवन पाणी पुरवठा व्यवस्था कार्यान्वित झाली. अनेक विकास कामे हाती घेण्यात आली. तसेच विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. गावात वृक्ष लागवड करण्यात आली.
या कामी माजी आमदार भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखाली माजी चेअरमन सुरेश गलांडे, लोकनियुक्त सरपंच सुभाष बोधक, व सहकारी पदाधिकारी यांनी मोलाचे सहकार्य केले. याचीच दखल शासनाने घेतली व पुरस्कार दिला गेला आहे. या पुरस्काराबद्दल बाभळेश्वर दुध संघ संचालक राजेंद्र पाउलबुद्धे, संचालक वीरेश गलांडे, बाळासाहेब नाईक, सरपंच सुभाष बोधक, उपसरपंच रमेश गायके, माजी ग्रामसेवक हितेश ढूमणे, ग्रामसेवक शरद वावीकर, सर्व ग्रा.प.सदस्य, सर्व कर्मचारी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.