क्रीडा

हाळगांव कृषि महाविद्यालयातील विद्यार्थीनीचा ट्रिपल जम्प स्पर्धेत तृतीय क्रमांक

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालय, लोणी येथे झालेल्या आंतरमहाविद्यालयीन अथेलेटिक्स स्पर्धा 2022-23, या स्पर्धेत महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हाळगावच्या चतुर्थ वर्षातील विद्यार्थिनी कु. प्रज्ञा घुले हिने ट्रिपल जम्प स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील एकूण 38 संघांनी आपला सहभाग नोंदविला होता. कृषि महाविद्यालय, हाळगावचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. गोरक्ष ससाणे यांनी कु. प्रज्ञा हिचे अभिनंदन केले. संघ व्यवस्थापक म्हणून महाविद्यालयाच्या प्रा. किर्ती भांगरे यांनी काम पाहिले. क्रीडा अधिकारी प्रा. दिलीप गायकवाड, महाविद्यालयाचे डॉ. चारुदत्त चौधरी आणि इतर प्राध्यापक व कर्मचारी वृंद यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केले.

Related Articles

Back to top button