क्रीडा

कबड्डी स्पर्धकांनी राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवावा-अविनाश आदिक; कबड्डी चाचणी स्पर्धांना प्रारंभ

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : अहमदनगर जिल्हा कबड्डी असो. व रामराव आदिक पब्लिक स्कूल निपाणी वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने अहमदनगर जिल्हा कुमार, कुमारी गट अजिंक्य पद व निवड चाचणी स्पर्धा शुभारंभ अहमदनगर जिल्हा कबड्डी असो. आजीव अध्यक्ष अविनाश आदिक यांचे हस्ते झाले.
त्यावेळी श्री आदीक प्रतिपादन केले की, प्रथमच अध्यक्ष पदाची जबाबदारी माझ्याकडे आली व पहिलाच प्रयत्न आहे. स्पर्धकांनी मनापासून या स्पर्धेत भाग घ्यावा, यात चांगले यश मिळवून जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय पातळीवर नावलौकिक करावा. आलेल्या स्पर्धक संघाना अविनाश आदिक, हंसराज आदीक व मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या. प्रारंभी माजी मंत्री स्व. गोविंदराव आदिक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. स्पर्धेसाठी मुलांचे १६ गट व मुलींचे ८ गट सहभागी झाले आहेत. त्यापैकी मुलींचा सलामी सामना रामराव आदिक पब्लिक स्कूल व आत्मा मलिक कोकमठाण यांच्यात झाला व बाजी आत्मा मलिक यांनी मारली. मुलांमध्ये आझाद टाकळीभान विरुद्ध स्वराज अकॅडमी हरिगाव यांच्यात झाला.
यावेळी कबड्डी असो.खजिनदार उल्हास जगताप, सचिव सुनील गाडेकर, तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष कैलास बोर्डे, विधानसभा अध्यक्ष सुनील थोरात, भाऊसाहेब वाघ, नितीन गवारे, तौसिफभाई, हर्शल दांगट, लक्ष्मण सुडके, हौशीराम गोरडे, रवींद्र गाडे, युवक अध्यक्ष सचिन पवार, शफीक मेजर, महेश कोल्हे, रियाज शेख, प्राचार्य घोगरे आदी मान्यवर व व्यवस्थापक प्रशिक्षक फुलारी, शिरोळे, पटारे, बागुल आदी उपस्थित होते. आभार प्रदर्शन प्रा सुनील गाडेकर यांनी केले.

Related Articles

Back to top button