क्रीडा
आंतरराष्ट्रीय ज्युडो कराटे चॅम्पियन स्पर्धेत शिरसगावच्या कन्येने पटकाविले गोल्ड मेडल
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : न्यु इंग्लिश आणि कनिष्ठ वाणिज्य महाविद्यालय शिरसगाव या महाविद्यालयातील इ.12 वी मध्ये शिकत असलेली कु.कल्याणी देसाई हिने नुकत्याच गोवा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ज्युडो कराटे चॅम्पियन स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवून चांगले यश संपादन केले आहे. या अगोदरही तीने मुंबई येथे झालेल्या राज्य स्तरीय स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले होते. कल्याणी देसाई हिला प्रशिक्षक सेनसाॅय हन्सी हसन इस्माईल आणि गौतम डे यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
यावेळी प्राचार्या सौ.औताडे यांनी बुके आणि मेडल देवुन तीचा सत्कार केला. तीच्या यशाबद्दल संस्था सचिव अविनाश आदिक, सहसचिव ॲड. जयंत चौधरी, प्राचार्या सौ.औताडे, पर्यवेक्षक व्ही.आय थोरात, क्रीडा शिक्षक राऊत, प्रा. वधवाणी, सौ. कांबळे, कु. आहिरे, सौ. दुधाट आदिंनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी तिला शुभेच्छा दिल्या.