छत्रपती संभाजीनगर

विज बिलाअभावी कारकीन फिडरवरील कृषी पंपांचा विज पुरवठा खंडीत

महावितरणकडून कृषी पंपाचे विजबिले भरण्याचे आवाहन
विलास लाटे | पैठण : सर्व कृषी पंपाच्या विज ग्राहकांना महावितरणकडून कार्यकारी अभियंता ग्रामीण विभाग १ औरंगाबाद, उपकार्यकारी अभियंता पैठण उपविभाग, तसेच सहाय्यक अभियंता ढोरकीन यांच्या आदेशानुसार कारकीन ए.जी. फिडर व नांदलगाव ए.जी. फिडर वरील कृषी पंपाचा विज पुरवठा हा खंडित करण्यात आला असल्याचे महावितरण कर्मचारी, जनमित्र जयेश चव्हाण यांनी सांगितले.
तसेच महावितरण ढोरकीन शाखा कार्यालय अंतर्गत येणाऱ्या कृषी वीज पंप ग्राहकांना देखील विजबिले भरण्याचे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे. दरम्यान ज्या डि.पी.वरील ८०% विज ग्राहक विज बिले भरणार नाहीत, तोपर्यंत डि.पी.पुर्वरत चालू होणार नसल्यामुळे कृषी पंपाचे विज बिल भरुन महावितरण कंपनीस सहकार्य करावे व आपल्या पिकांचे होणारे नुकसान टाळावे असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.
डि.पी. दुरुस्तीकरुन सुरु ठेवा व वीजबिले जमा करावी
    दरम्यान महावितरणने कृषी पंपाचा विजपुरवठा खंडीत करण्यास सुरुवात केल्याने पिकांना पाणी देण्याची चिंता आता शेतकऱ्यांना लागली आहे. परंतु तसे न करता विज पुरवठा सुरु ठेवावा व विज बिले वसुल करावी. तसेच डिपीतील बिघाड असल्यास तात्काळ दुरुस्त कराव्यात व अतिरिक्त भार असलेल्या ठिकाणी तात्काळ नविन डिपी बसवावी अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Related Articles

Back to top button