अहिल्यानगर
बेलापूर कंपनी हायस्कुल येथे महात्मा फुले पुण्यतिथी साजरी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरेगांव येथील बेलापूर कंपनी हायस्कुल येथे महात्मा ज्योतीराव फुले यांची १३२ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
प्रारंभी शाळेचे माजी मुख्याध्यापक के.एस. काळे यांनी महात्मा ज्योतीराव फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला व आरोग्य मित्र भिमराज बागुल यांनी प्रतिमा पुजन केले.वमने सरांनी प्रास्तविक करून मनोगत व्यक्त केले. काळे यांनी आपल्या भाषणातुन विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक झिने, मदन कर्डीले, कल्याणी क्षीरसागर, निलांजली गायकवाड, ज्योती त्रिभुवन, नयना त्रिभुवन, दिपाली यादव, राजू जाधव, अनिता शेळके, सविता डांगोरकर आदी शिक्षकवृंद उपस्थित होते. शेवटी मदन कर्डीले यांनी आभार मानले.