शिक्षणवारी ज्ञान पंढरी

के.एल.पोंदा हायस्कूल, डहाणू येथे सेवा पंधरवडा निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन

राहुरी | जावेद शेख : दि डहाणू एज्युकेशन ट्रस्ट संचालित शाळा के.एल.पोंदा हायस्कूल डहाणू जिल्हा पालघर येथे भारताचे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सेवा पंधरवडा साजरा करण्यात आला.
यासाठी शाळेचे मुख्याध्यापक रविंद्र बागेसर यांच्या अनमोल मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका जेष्ठ साहित्यिका सौ.अनुपमा जाधव यांनी या सर्व उपक्रमांचे आयोजन अतिशय सुंदर रितीने केले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळाला. कला म्हणजे सत्य, शिव आणि सौंदर्य यांचा सुरेख संगम असतो. शाळा व शाळेचा परीसर स्वच्छ करुन, वर्ग सजावट केली गेली. स्वच्छ भारत अभियान., स्वच्छ शाळा, स्वच्छ परीसर, घर, आरोग्य स्वच्छता यांचे ही महत्त्व
विद्यार्थ्यांना सांगितले.
या स्पर्धांमध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी, संत तुकडोजी महाराज, गाडगे महाराज या विषयावर निबंध स्पर्धा, वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. यात रोज एक उपक्रम राबविण्यात आला. रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यात राष्ट्रपिता महात्मा गांधी, स्वच्छ भारत, सुंदर भारत, निसर्ग, पर्यावरण जनजागृती, फुल, पान अशा विविध प्रकारच्या रांगोळ्यांनी शालेय परिसर सुंदर केला.
मातीकाम यात विद्यार्थ्यांच्या हस्त कला, नव निर्मितीचा आनंद दिसून आला, मातीच्या गणपतीच्या मूर्ती, शंकराची पिंड, विविध मूर्ती, अनेक फळं, फुलं, मातीपासून तयार करण्यात आली. अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. वेशभूषा स्पर्धा घेण्यात आली. यात चिमुकल्या, गोजिरवाण्या विद्यार्थ्यांनी विविध भुमिका साकारल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद काही औरच…! वकृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यात विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, भाषण व सुंदर सादरीकरण दिसून आले.
प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना ऐतिहासिक माहिती, थोर पुरुषांच्या जीवन कार्याचे महत्त्व कळले. वाचन, लेखन, स्वावलंबी जीवन, साधी राहणी उच्च विचारसरणी, अनेक प्रकारची उपयुक्त माहिती, ज्ञान मिळाले. चित्रकला स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद घेतला. राष्ट्रपिता महात्मा गांधी, पर्यावरण जनजागृती, स्वच्छ भारत अभियान,असे विविध प्रकारचे चित्र त्यांनी काढले. मुख्याध्यापक रविंद्र बागेसर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
रानभाज्या महोत्सवात अनुपमा जाधव यांनी रान भाज्यांची उपयुक्त माहिती, त्यांचे महत्त्व सांगितले. अशा भाज्या दुर्मिळ होत असल्याने आपण पर्यावरणाची काळजी घ्यावी. पर्यावरण जनजागृती, जतन संवर्धन करायला हवे. करडई भाजी, तांदुळजा, अंबाडी, कुरुडू, चुका, चिकळ (घोळ) पिंपळ, गुळवेल भाजी, हादगा, मुळ्याची शेंग भाजी, उबंरफळ भाजी, सराटा भाजी, हरभरा भाजी, पाथरी भाजी, राजगिरा भाजी अशा विविध प्रकारच्या भाज्या असतात. काही भाज्यांची चित्रे, फोटो देखील दाखवले, दुर्मिळ भाज्या पाहून विद्यार्थ्यांना कुतूहल, आश्चर्य वाटले.त्याच बरोबर थाळी सजावट देखील उपक्रम घेण्यात आला.
या विविध उपक्रमात इयत्ता पाचवी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आदित्य पात्र, इशिका माहयावंशी, नेहा पाटील, रुचिका धिंडे, जिनल माचछी, प्रतिज्ञा मौर्या, सोनम यादव, अंकिता यादव, मुकेश गुप्ता, मैत्रेय सुतार, निर्मला राजपूत, प्रांजली यादव,तनीषा, समिक्षा आऊजी, मिफता, खुशी शाह, अमर सिंह, अनन्या यादव, विशाखा पटेल, किरण भारद्वाज, रितु प्रजापती, आरीफा शाह, सुप्रिया पांडे, साईबा कुरेशी, अस्मिता, दर्शना देवा, रितू प्रजापती, खुशी निशाद, दिपिका पारधी, अक्षता झिंबल, कंचन प्रजापती, खुशी चव्हाण, शिवानी जयस्वाल, अशना शेख या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला. शाळेचे उप मुख्याध्यापक मिलिंद पाटील, पर्यवेक्षक सुनील मोरे यांनी या उपक्रमाबद्दल कौतुक करुन आनंद व्यक्त केला. शाळेच्या शिक्षक बंधू व भगिनी, पालक वर्गांनी या उपक्रमाबद्दल अभिनंदन केले.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन करण्यात आले. अशा रीतीने या सेवा पंधरवडा यशस्वी रितिने साजरा केल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक रविद्र बागेसर यांनी उपक्रमशील शिक्षिका अनुपमा जाधव या सोपविलेली जबाबदारी, उपक्रम सुंदर रितीने पुर्ण करतात असे गौरवोद्गार काढले व सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Related Articles

Back to top button