अहिल्यानगर

राहुरी कृषि विद्यापीठात महत्त्वाच्या रिक्त पदांचा अधिकार्यांना अतिरिक्त पदभार

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी विद्यापीठातील अधिष्ठाता (कृषि), संशोधन व विस्तार शिक्षण संचालक पद, पदव्युत्तर महाविद्यालय व डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता या रिक्त पदांवर नेमणुका केल्या आहेत.
यामध्ये डॉ. प्रमोद रसाळ यांची अधिष्ठाता (कृषि) या पदावर, कृषि अभियांत्रिकी विभाग प्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार यांची संचालक, संशोधन या पदावर, पीक रोग शास्त्र व कृषि अनुजीव शास्त्र विभाग प्रमुख डॉ. तानाजी नरुटे यांची संचालक, विस्तार शिक्षण या पदावर, अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभाग प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांची पदव्युत्तर महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता या पदावर तर डॉ. दिलीप पवार यांची डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता या रिक्त पदांचा अतिरिक्त पदभार दिला आहे. विद्यापीठाचे कामकाज सुरळीतपणे चालण्यासाठी कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील व कुलसचिव प्रमोद लहाळे यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

Related Articles

Back to top button