अहिल्यानगर
लोणी खुर्द ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना ९ लाख २६ हजारांचा बोनस – सरपंच घोगरे
लोणी : अहमदनगर जिल्हात लोकसंख्येने सर्वात मोठ्या असलेल्या लोणी खुर्द ग्रामपंचायतने आपल्या कर्मचाऱ्यांना दोन महिन्याचे वेतन सानुग्रह अनुदान व एक महिन्याचे वेतन पोटी दिवाळी निमित्त ८ लाख ७६ हजार रुपये व प्रत्येकी दोन गणवेश, महिला कर्मचाऱ्यांना साड्या तसेच कर्मचाऱ्यांना प्रत्येकी पाच किलो साखर या पोटी जवळपास पन्नास हजार रुपये अशी एकूण ९ लाख २६ हजार रुपये वाटप करून कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड केल्याची माहिती लोणी खुर्दचे सरपंच जनार्दन घोगरे यांनी दिली आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करणारी लोणी खुर्द ग्रामपंचायत जिल्ह्यातील पहिलीच ग्रांमपंचायत आहे.
लोणी खुर्द ग्रामपंचायतचे कर्मचारी गावासाठी काम करत असुन गावातील नागरी सुख सुविधा पुरविण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. आरोग्य, पाणी पुरवठा, दिवाबत्ती, स्वच्छता, रोगप्रतिबंधक फवारणी, तणनाशक फवारणी आवश्यक कामात ग्रामपंचायत चे ३० कर्मचारी स्वतःला झोकुन रात्रंदिवस काम करत आहे. अशा आपल्या ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी निमित्त न्याय मिळावा या हेतुने साठ दिवसांचा बोनस चालु महिन्याचे वेतन यापोटी ८ लाख ७६ हजार रुपये तर गणवेश पोटी ५० हजार रुपये असे एकुण ९ लाख २६ हजार रुपये वाटप करुन त्यांची दिवाळी गोड करणार असल्याची माहीती सरपंच जनार्दन घोगरे यांनी दिली.
यावेळी उपसरपंच आर्चनाताई आहेर, ग्रामपंचायत सदस्या कृषीभुषण प्रभाताई घोगरे, सुनिता कोरडे, ललिता आहेर, आशा आहेर, रुपाली घोगरे, ज्योती आहेर, विलास घोगरे, प्रदीप ब्राम्हणे, मायकल ब्राम्हणे, ग्रामविकास अधिकारी गणेश दुधाळे उपस्थित होते. दोन महिन्याचा पगार सानुग्रह व एक महिन्याचा पगार दिवाळी निमित्त वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर करणारी लोणी खुर्द ग्रामपंचायत जिल्हयातील पहीलीच ग्रांमपंचायत ठरली असुन कामगारामधुन समाधान व्यक्त होत आहे.