ठळक बातम्या

महसुलचा क्युआर कोड फक्त भांडण तपासायला का? – कृषीभुषण प्रभाताई घोगरे

लोणी : महसुलचा क्युआर कोड महसुली निकाल घरबसल्या पाहण्याकरिता होणार असला तरी महसुलचा क्युआर कोडचा वापर फक्त लावलेली भांडण तपासायलाचं होणार का? असा प्रश्न उपस्थित करून महसुल विभागाशी संबंधित विविध कामे याद्वारे केली जावीत, अशी मागणी लोणी खुर्द येथील कृषीभुषण प्रभाताई जनार्दन घोगरे यांनी केली आहे.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, महसुल विभागाने जो क्युआर कोड काढलेला आहे, तो गावाचे नकाशे, सातबारा, फेरफार, गावाचे १ ते २१ नमुने दप्तर, जन्म, मुत्यु, विवाह नोंदी, शासनाकडून प्राप्त होणारे सर्व अनुदान यादी, विविध पंचनामे, गावातील शिवार रस्ते, वहिवाटीचे रस्ते, रस्ते, झाडे, विहीर पाणी, पाईपलाईन, रेशनकार्ड, संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ वृध्दापकाळ योजना, सर्व प्रकारची ओळखपत्र, गौणखनिज परवाना, महा ई सेवा केंद्रात उपलब्ध होणारे सर्व प्रमाणपत्र याकरिता क्युआर कोड चा वापर झाला पाहिजे म्हणजे सामान्य नागरिकांना तसेच शेतकऱ्यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे घरबसल्या प्राप्त होईल. त्यांचा वेळ व आर्थिक हेळसांड नक्कीच थांबेल यातुन प्रशासकीय कामात पारदर्शकता येईल.
क्युआर कोडचा वापर फक्त महसुल मध्ये लावलेली भांडणाची निकाले पाहण्याकरिता म्हणजे भांडण तपासण्याकरिता होणार असेल तर त्याचा उपयोग काय? ते महसुलच्या नावाप्रमाणेच अर्धन्यायिक राहील. आज अनेक सामान्य नागरिक तहसील कार्यालय, मोजणी कार्यालय, महा – ई सेवा केंद्र याकडे स्वतःच्या शेतजमीनीच्या विविध कागदपत्रांसाठी, महा – ई सेतुमध्ये उपलब्ध होणारे सर्व प्रमाणपत्रासाठी सकाळ पासुन ते संध्याकाळपर्यंत बसुन राहतात. त्यासाठी त्यांना आव्वाचे सव्वा पैसे मोजावे लागतात. येण्याजाण्याचा त्रास होतो. काही वयोवृद्ध व माता भगिनींना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. याच्यांसाठी क्युआर कोड चा वापर कधी होईल? त्यांना त्यांची कागदपत्रे घरच्या घरी कधी उपलब्ध होईल.
त्यामुळेच महसुल विभागाने यापुढे भांडणाची निकाले क्युआर कोडला शेतकऱ्यांना घरबसल्या पाहण्यापेक्षा आपल्या विभागाकडुन दिले जाणाऱ्या सर्व सेवा साठी क्युआर कोड वापरला तर पैसाही वाचेल, वेळही वाचेल लावलेली भांडणंही कमी होईल यापेक्षाही यात फोपावलेला भष्टाचार कमी होण्यास नक्कीच मदत होईल. शेतकऱ्यांना स्वतःच्या शेतजमिनीची, दैनंदिन शासकीय कामकाजाची सर्व कागदपत्र क्युआर कोड वापर करुन स्वतःच्या मोबाईलवर घरच्या घरीचं पाहता येतील व ती डिजिटल स्वाक्षरीत असल्याने त्याला कुठेही उंबरठे झिजवायची वेळ नक्कीच येणार नाही.
आजच्या युगात क्युआर कोड चा वापर फक्त लावलेली भांडण व त्याचे निकाल पाहण्यासाठी होणार असेल तर ते अर्धवट असुन जनहितार्थ नाही असे मत प्रभाताई घोगरे यांनी व्यक्त केले आहे.

Related Articles

Back to top button