अहिल्यानगर
डॉ. भट्टड यांची नियुक्ती आयुर्वेदिक चळवळीला नवसंजीवनी
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आयुर्वेद महासंमेलनाच्या अध्यक्षपदी आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र चे कार्याध्यक्ष डॉ. सतीश भट्टड यांची निवड म्हणजे दिव्यांग क्षेत्रातील सामाजिक अभिसरण चळवळीला आयूर्वेदिक नवसंजीवनी देणारा बुस्टर डोस होय असे प्रतिपादन आसान दिव्यांग संघटनेचे अंध विभागाचे राज्य समन्वयक विनोद कांबळे यांनी सत्कार समारंभ प्रसंगी केले.
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर व आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र आयुर्वेद महासंमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. सतीश भट्टड यांची निवड झाल्याबद्दल आरोग्याची देवता श्री भगवान धन्वंतरी जयंती निमित्त सत्कार समारंभ अपंग सामाजिक विकास संस्थेच्या सचिव वर्षा गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला होता.
याप्रसंगी अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, योगविद्या तज्ञ डॉ. सुचिता भट्टड, आसान दिव्यांग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष सुनिल कानडे, जिल्हाध्यक्ष विश्वास काळे, खजिनदार सौ.साधना चुडिवाल, सौ सारिका कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी बालरोग तज्ञ डॉ. कुमार चोथाणी, नेत्ररोग तज्ञ डॉ. संजय शेळके, अतुल सोनोग्राफी सेंटर्स चे डाॅ.अतुल करवा, डॉ.जयस्वाल हाॅस्पिटलचे डॉ.सागर जयस्वाल, डॉ. सौ. स्पृर्ती जयस्वाल, शिवसेना नेते डॉ. महेश क्षिरसागर, श्री. व सौ. डॉ. कबाडी यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संजय साळवे यांनी केले तर आभार सौ साधना चुडिवाल यांनी मानले.