अहिल्यानगर
पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला गती मिळाली – आ.जयंत पाटील
राहुरी | बाळकृष्ण भोसले : पतसंस्थांमुळे ग्रामीण भागाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. ग्रामीण भागातलाच पैसा ग्रामीण भागातच राहिल्याने अर्थकारणाला वेगळी गती मिळाली असे प्रतिपादन माजी जलसंपदा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी केले.
गुहा येथील प्रेरणा मल्टीस्टेट प्रेरणा संस्था व प्रेरणा विविध कार्यकारी संस्थांना त्यांनी सदिच्छा भेट दिली, त्यावेळी सभासदांची हितगुज करताना ते बोलत होते. १९ वर्षांपूर्वी पतसंस्थेला जयंत पाटील यांनी भेट दिली होती. वीस वर्षात संस्थेने केलेल्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड धरत संस्थेने सभासदांचा जो विश्वास कमवला ते भांडवल सर्वाधिक महत्त्वाचे असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.
संस्थेच्या आजपर्यंतच्या प्रगती बरोबरच प्रेरणा मल्टीस्टेट प्रेरणा विकास कार्यकारी सोसायटीने विविध राबविलेल्या उपक्रमाविषयी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुरेशशेठ वाबळे यांनी माहिती दिली. बँकिंग सुविधा मोठ्या प्रमाणावरती उपलब्ध केल्यामुळे सभासदांची मोठी सोय झाली आहे. त्याबद्दल जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी सर्व संस्थांचे व्हा चेअरमन, संचालक मंडळ, ग्रामपंचयतचे सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.