कृषी
राहुरी कृषि विद्यापीठाचे रब्बी ज्वारी बियाणे उपलब्ध
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या विविध पिकाच्या वाणांना शेतकर्यांची प्रथम पसंती असते. विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने जमिनीच्या प्रकारानुसार रब्बी ज्वारीचे वाण विकसीत केले आहेत. यामध्ये हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा, भारी तसेच बागायती जमिनीसाठी फुले वसुधा, फुले रेवती व लाह्यांसाठी फुले पंचमी हे वाण विकसीत केले आहेत.
कृषि विद्यापीठाच्या बियाण्यांवर शेतकर्यांचा विश्वास असून शेतकर्यांना विनाकष्ट व त्यांच्या विभागामध्ये किंवा जवळील जिल्ह्यामध्ये बियाणे उपलब्ध व्हावे म्हणुन विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांचे सुचनेनुसार व संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती परिसर, कृषि संशोधन केंद्र, सोलापूर, पंढरपूर, कृषि विज्ञान केंद्र, मोहोळ, कृषि संशोधन केंद्र, चास, सावळीविहीर, कृषि तंत्र विद्यालय केंद्र, पुणतांबा या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध करुन दिले आहे.