सामाजिक
वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप; विशाल राठोड यांचा स्तुत्य उपक्रम
विलास लाटे | पैठण : तालुक्यातील तांबे डोणगाव येथील पैलवान विशाल राठोड याने डोणगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना वह्या स्वखर्चातून वाटप करण्यात आल्या. मला लहानपणापासून समाजसेवेची आवड आहे, यामुळे वाढदिवसावर कुठलाही वायफळ खर्च न करता हा निर्णय घेतला. ज्या मुळे गोरगरीब विद्यार्थांना यांचा फायदा होईल. वह्या वाटप झाल्या नंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळेतर्फे विशाल राठोड चा केक कापुन सत्कार करण्यात आला.
यावेळी पंचायत समिती सदस्य सुनिल तांबे, पोलिस बाॅईज असोसिएशन महाराष्ट्र राज्य पैठण तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील तांबे, ऑल इंडिया बंजारा सेवा संघ तालुकाध्यक्ष अविनाश जाधव, दत्ता तांबे, विकास राठोड, संजय राठोड, युवराज नवले, विष्णू बोबडे, दिपक राठोड, शाळेचे मुख्याध्यापक अंकुश चव्हाण, बनसोडे, राठोड, पवार आदींसह शिक्षक वृंद व गावातील मित्र उपस्थित होते. त्यांच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक होत आहे.