शिक्षणवारी ज्ञान पंढरी

बिडकीन येथील स.भु. प्रशालेत हिंदी दिवस उत्साहात साजरा

विलास लाटे | पैठण : तालुक्यातील बिडकीन येथील सरस्वती भुवन प्रशालेत राष्ट्रीय हिन्दी भाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्रशालेचे उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे तर प्रमुख पाहुणे म्हणून मंगेश डोलारे, ज्ञानेश्वर चाटुपळे, आसिफ शेख, श्रीमती मेश्राम, संजय कुलकर्णी, तुषार अहिरे, रजनी चिलवार तर प्रमुख वक्ते म्हणून प्रा. प्रदीप ठोसर, श्रीमती बैरागी, मंगला गायधने, श्रीमती जाफरी, इंदिरा बच्छाव उपस्थित होते.
दरम्यान, प्रमुख अतिथी यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती जाफरी यांनी केले. यावेळी मनप्रीत राठोड, शेख महेक, शेख तबस्सुम, प्रिती गायकवाड या विद्यार्थ्यांनी हिंदी भाषेचे महत्त्व याविषयी माहिती दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध भित्तीपत्रकाचे विमोचन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते झाले. इयत्ता सातवीच्या विद्यार्थीनींनी विविध वेशभूषा करून विविधतेतून एकता हा संदेश देण्याचा प्रयत्न केला. प्रमुख वक्ते प्रा. प्रदीप ठोसर व मंगेश डोलारे यांनी अत्यंत अभ्यासपूर्ण व ओघवत्या भाषा शैलीत हिंदी भाषेचा इतिहास व महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोप उपमुख्याध्यापक राजेंद्र कोठावदे यांनी केला. हिंदी दिनाच्या निमित्ताने प्रशालेत विविध उपक्रमाच्या माध्यमातून हिंदी पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेहरोज बेग तर आभार आशिष जाधव याने केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय कुलकर्णी, रजनी चिलवार, इंदिरा बच्छाव, श्रीमती बैरागी, श्रीमती मेश्राम, श्रीमती जाफरीसह सर्व हिंदी भाषेचे शिक्षक, शिक्षिकांनी परीश्रम घेतले.

Related Articles

Back to top button