अहिल्यानगर
शिरसगाव सोसायटीचे कार्य गौरवास्पद – अनुराधा आदिक; सभासदांना १२ टक्के डिव्हिडंड मिळणार…
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे – शिरसगाव सोसायटीचे कार्य प्रगतीपथावर असून गौरवास्पद आहे असे प्रतिपादन माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी शिरसगाव येथे केले.
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील विविध कार्य. सोसायटीची वार्षिक सभा अत्यंत खेळीमेळीत सभासदांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक म्हणाल्या की, सोसायटीचे हे काम आहे सध्या नवरात्र उत्सव सुरु असल्याने देवी सढळ हाताने मदत करीत असते. सध्या १२ टक्के डिव्हिडंड जाहीर झाला असला तरी पुढच्या वर्षी १५ ते २५ टक्के जाहीर होईल अशी अपेक्षा करते. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्याचप्रमाणे अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अविनाशदादा यांच्या मदतीने कृषक समाज यांच्या वतीने मी शासन दरबारी नक्कीच पाठपुरावा करून जितकी मदत सहकार्य करता येईल, विविध योजनांचा लाभ मिळणेसाठी प्रयत्न राहील.
संस्थेचे चेअरमन किशोर पाटील यांनी सभेचे प्रास्तविक करून सर्वांचे स्वागत केले व सांगितले की, सोसायटी सभासदांची संख्या ७४३ असून संस्थेस नफा १७.३२ लाख झाला. संस्थेच्या सभासदांनी आग्रह केल्यामुळे आम्ही सभासदांना १२ टक्के डिव्हिडंड जाहीर करीत आहोत. संस्थेच्या प्रगतीसाठी, वसुलीसाठी कैलास गवारे, कुसुमबाई गवारे, गजानन बकाल, निलेश बकाल, सोपानराव गवारे, माधवराव पवार आदींनी विशेष सहकार्य केले. संस्था अहवाल, विषय वाचन सचिव सुभाष यादव यांनी केले. सर्व विषयांना सर्वानुमते मंजूर करण्यात आले. बिनविरोध निवडून आलेले, विशेष सहकार्य करणारे व इतर मान्यवरांचा यावेळी अनुराधा आदिक व गणेशराव मुद्गुले आदींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. अनुराधा आदिक यांचा सत्कार संचालिका बबईबाई काळे यांनी केला.
यावेळी सोमनाथ गांगड, सोपानराव गवारे, चेअरमन किशोर पाटील, व्हा.चेअरमन सुभाष बोंबले, माजी चेअरमन साईनाथ गवारे, चांगदेव बकाल, बाळासाहेब गवारे, नितीन गवारे, संजय गवारे, विजय गायकवाड, जयराम पवार, दिनकर यादव, मुख्याध्यापिका औताडे, पौर्णिमा काळे, जयश्री यादव, संगीता गवारे, अर्चनाताई पानसरे, मीराबाई गवारे, सौ अभंग, दत्तात्रय गवारे, सुभाषराव गवारे, गंगाधर त्रिभुवन आदी उपस्थित होते.