छत्रपती संभाजीनगर
कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांना मंत्रीपद देवून बंजारा समाजाला खरा न्याय- डाॅ.कृष्णा राठोड
विलास लाटे | पैठण : बंजारा समाजाचे नेते तथा माजीमंत्री संजय राठोड यांचा पुन्हा एकदा मंत्रीमंडळात समावेश झाल्याने राज्यातील बंजारा समाज बांधवांना प्रचंड आनंद झाला आहे. राज्यभर फटाक्यांची अतिशबाजी करून व ढोलताशांच्या गजरात जल्लोष साजरा केल्या जात आहे. काल वसंतराव नाईक चौकात समर्थकांनी एकमेकांना पेढे भरवून व घोषणा देऊण फटाक्यांच्या आतषबाजी करत आंनदोस्तव साजरा केला आहेे.
मागील काळात संजय राठोड यांनी संघर्ष मेळाव्याच्या माध्यमाने संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक तांडा वस्तीवर जाऊन समाजाची खरी परिस्थिती जाणून घेत सर्वांशी संपर्क साधला होता. समाजाचे ते एकमेव लढवय्ये खंबीर नेते असल्याने त्यांच्या त्यांच्या मंत्रीमंडळात समावेशासाठी सर्वजन आशेने पाहत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संजय भाऊना मत्रीमंडळात स्थान देवून खर्या अर्थाने समाजाला न्याय दिला आहे, त्यामुळे समाज भविष्यात त्यांच्या पाठीशी एकजुटीने उभा राहील असे मत डाॅ. कृष्णा राठोड यांनी आभार सभेत व्यक्त केले. ॲड. अभय राठोड यांनी संजय भाऊ हे समाजातील तळागाळातील जनतेसाठी इमानदारीने लढणारे नेते असून समाजाने त्यांचे हात बळकट करावे असे अहवान केले. खोट्या आरोपामुळे स्वतः राजीनामा देऊन बाजूला होणारे ते एकमेव मंत्री आहेत. त्यामुळे विरोधकांनी आता तोंड बंद करावे अन्यथा बंजारा समाज त्यांना सडेतोड उत्तर देईल असे मत दत्ताभाऊ राठोड यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी डॉ. कृष्णा राठोड, ॲड.अभय राठोड, दत्ताभाऊ राठोड, वैजनाथ राठोड, राजू राठोड, अर्चीत नाईक, गणपत पवार, मुरहारी जाधव, शालीग्राम राठोड, किसन राठोड, दिलीप राठोड, रमेश राठोड, गुलाब चव्हाण, डी.एस.पवार, संजय जाधव, राजेश राठोड, प्रकाश चव्हाण, पी. डी.राठोड, रवी भाऊ राठोड, नवनाथ राठोड, अरुण राठोड, सुनील राठोड, शिवाजी राठोड, संतोष राठोड यांच्यासह शेकडो बंजारा बांधव उपस्थित होते.