कृषी

लिंबू पिकाचे व्यवस्थापन विषयावरील शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक संपन्न

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील उद्यानविद्या विभागांतर्गत असलेल्या आखिल भारतीय समन्वित फळपिके संशोधन प्रकल्पाच्या वतीने लिंबू पिकाचे व्यवस्थापन या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी मु. पो. आनंदवाडी ता. श्रीगोंदा जि. अहमदनगर येथे शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे सरपंच सुदामराव नलावडे होते. या कार्यक्रमामध्ये उद्यान विद्यावेत्ता डॉ. प्रमोद पाचनकर यांनी लिंबू पिकाचे लागवड तंत्रज्ञान या विषयी मार्गदर्शन केले. डॉ. रणजीत कडू यांनी किड व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन केले. तसेच जैविक किड नियंत्रण व रासायनिक किटकनाशकाचा योग्य वापर या विषयी उपस्थित शेतकर्यांना माहिती दिली. प्रा. मधुकर शेटे यांनी लिंबू पिकामध्ये येणार्या रोगाविषयी सविस्तर मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमासाठी परिसरातील लिंबू उत्पादक शेतकरी आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी लिंबू उत्पादक संघाचे अध्यक्ष गोरख आळेकर यांनी लिंबू पिकाच्या बाजारभावाविषयी मार्गदर्शन केले. कृषि विभागाचे कृषि सहाय्यक श्री. उगले यांनी अनुदानासबंधी माहिती दिली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रगतशील शेतकरी आदिक वागणे यांनी केले.

Related Articles

Back to top button