अहिल्यानगर
मनस्थिरतेसाठी ईश्वर चिंतन गरजेचे – महंत रामगिरी महाराज
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : मन स्थिरतेसाठी प्रत्येकाला ईश्वर चिंतन गरजेचे आहे असे प्रतिपादन सरला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी श्रीरामपूर येथे झालेल्या लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयात केले.
वेदांत शास्त्रानुसार भारतीय संस्कृतीमध्ये मृत्यू म्हणजे सर्वनाश मानला जातो. आत्मा सनातन आहे. जन्मत नाही मरत नाही जन्म मरण हे शरीराला असते. ज्या प्रमाणे जीर्ण वस्त्राचा त्याग करून नवीन वस्त्र धरण करतो. त्याप्रमाणे तो आत्मा जीर्ण शरीराचा त्याग करतो व नवीन शरीर परिधान करतो. त्याला पुनर्जन्म असे म्हणतात. एक जन्माचे दु:ख आहे, एक मरणाचे दु:ख आहे. एक मृत्यूचे दु:ख आहे. एक रोगाचे दु:ख आहे. यातून संसारातून एकदा आपल्याला जावेच लागते. निरर्थक चिंतन करणे हा मानवाचा स्वभाव आहे. मनाचा स्वभाव सारखा नसतो मन हे सतत भरकटत असते. चंचल मनाला स्थिर करण्यासाठी ईश्वर चिंतन हे प्रत्येकाला आवश्यक आहे.
संत महात्मे याचाच मागोवा घेत जीवाला मार्गदर्शन करीत असतात. प्रेम करतो प्रेमाच्या पाठीमागे स्वार्थ असतो. तो सेवा करतो असे नाही तर बापाला अपेक्षा असते प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा असते. जेंव्हा सर्व आश्रय तुटतात तेंव्हा माणसाला भगवंताची आठवण आल्याशिवाय राहत नाही. नको नको मना गुंतू मायाजाळी काळ आला जवळी ग्रासावया या अभंगावर सुंदर चिंतन असे कीर्तन सरला बेट मठाधिपती महंत रामगिरी महाराज यांनी स्व.गं भा गंगुबाई जोंधळे यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी लक्ष्मी त्रिंबक मंगल कार्यालयात केले.
यावेळी अशोक जोंधळे परिवार, सोपानराव गवारे, लक्ष्मीनारायण जोंधळे, डॉ राजाराम जोंधळे, अरविंद जोंधळे, रामदास गवारे, डॉ प्रदीप दिघे, डॉ बी आर आदिक, शिवाजीराव गवारे, सतीश गवारे, गजानन जोंधळे, ज्ञानेश्वर जोंधळे, संग्राम जोंधळे, शिवाजीराव जोंधळे, सौ वंदना मुरकुटे,अतुल गवारे, नितीन सोपानराव गवारे, भागचंद औताडे, रंगनाथ माने, साहेबराव पवार, विजय इंद्रनाथ थोरात आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिरसगाव येथे दि १७ ऑगस्ट पासून अखंड हरीनाम सप्ताह श्रोमद भागवत कथा व श्री साई सतचरीत पारायण सोहळा प्रारंभ होत आहे.