अहिल्यानगर
प्रथमच दिव्यांग व्यक्तींचे जीवनमान व समस्या जवळून पाहिल्याने मन भरून आले -लायन्स क्लब अध्यक्ष चेतन भुतडा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : आझादी का अमृत महोत्सव अपंग सामाजिक विकास संस्था,आसान दिव्यांग संघटना व लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तीच्या समवेत रक्षाबंधन व सांस्कृतिक महोत्सव साजरा करण्यात आला. दिव्यांग व्यक्तीच्या जीवनात सक्षमीकरण करण्यासाठी अहोरात्र प्रयत्नशील असणारे संजय साळवे व सौ.वर्षा साळवे दांपत्य दिव्यांग क्षेत्राकरिता दिपस्तंभाचे कार्य करत आहेत. दिव्यांग संस्था व संघटनेच्या पाठीशी लायन्स क्लबचे सर्व पदाधिकारी व लायनेस सतत पाठीशी राहतील. प्रथमच दिव्यांग व्यक्तीच्या जीवनमान व समस्या जवळून पाहिले मन भरून आले असे प्रतिपादन रक्षाबंधन व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून लायन्स क्लबचे अध्यक्ष चेतन भुतडा यांनी केले.
अपंग सामाजिक विकास संस्था श्रीरामपूर, आसान दिव्यांग संघटना महाराष्ट्र व लायन्स क्लब ऑफ श्रीरामपूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व्यक्तीकरिता रक्षाबंधन व सांस्कृतिक महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन सहर्षा हाॅल बोंबले पाटील नगर याठिकाणी करण्यात आले होते.कार्यक्रमासाठी लायन्स क्लबचे मा अध्यक्ष पुरुषोत्तम झंवर, सुनिल साठे, प्रविण गुलाटी, जयकिशन मिलाणी, अपंग सामाजिक विकास संस्थेचे चेअरमन संजय साळवे, सचिव वर्षा गायकवाड, सौ.वर्षा झंवर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरुवात आसान दिव्यांग संघटनेचे राज्य समन्वयक विनोद कांबळे सर यांनी देशभक्तीपर गीताने केली श्रीरामपूर पंचायत समिती दिव्यांग विभागाचे विशेष शिक्षक इरफान पठाण यांनी दातांनी दोन नारळ सोलून अनोखी कला सादर करून स्वागत करण्यात आले. सदर प्रसंगाने सर्वांनाच मंत्रमुग्ध केले. याप्रसंगी कु.रोहिणी गायकवाड हिने मनमोहक आवाजात गीत सादर केले.