शिक्षणवारी ज्ञान पंढरी
वाचन संस्कृती प्रतिष्ठान आयोजित स्पर्धेत खोकर विद्यालयाचे सुयश
श्रीरामपुर | बाबासाहेब चेडे : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने वाचन संस्कृती प्रतिष्ठान वतीने विविध स्पर्धांचे आयोजन केले होते. कविता लेखन स्पर्धेत गोरक्षनाथ माध्यमिक विद्यालय खोकर येथिल विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन यश संपादन केले. त्यात प्रथम क्रमांक सोहम निलेश जोशी, द्वितीय क्रमांक समिक्षा सोन्याबापु कोळपे व तृतीय क्रमांक भार्गवी मिलिंद भणगे, आयुष बापूराव सोनवणे व उत्तेजनार्थ पारितोषिक सोहम संतोष बिरदवडे यांना गौरवण्यात आले.
विद्यालयातील विद्यार्थी प्रतिनिधी गौरव दादासाहेब चक्रनारायण व विद्यार्थीनीं प्रतिनिधी कु.सानिया फैयाज शेख तसेच लोकमान्य टिळक उत्कृष्ट वेशभूषा पारितोषिक प्रतिक नवनाथ डोळस यासं देण्यात आले. कु. गायत्री चव्हाण हिने संपूर्ण उपक्रमाचे उत्तम असे चित्रीकरण केले. त्याबद्दल तिचाही वाचन संस्कृती प्रतिष्ठानने सन्मान केला. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ.मंदाकिनी खाजेकर, वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ बाबुराव उपाध्ये, ग्रामस्थ आणि पालक, विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आदींनी विशेष अभिनंदन केले आहे. संगीता फासाटे यांनी मार्गदर्शन केले.