अहमदनगर
घुलेवाडी येथे श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न
संगमनेर शहर
: १७ ऑगस्ट २२ ते २४ ऑगस्ट २२ दरम्यान सालाबाद प्रमाणे याही वर्षी समस्थ ग्रामस्थ घुलेवाडी यांच्या सहकार्याने तसेच कै. पोपट बाबांच्या आशीर्वादाने ह.भ.प. सखाराम महाराज तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व ह.भ.प. रामनाथ महाराज राऊत यांच्या प्रेरणेने सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते.ह.भ.प रोहिणीताई कार्ले, ह.भ.प.पोपट महाराज आगलावे, ह.भ.प. श्यामसुंदर महाराज सोडणार, ह.भ.प. प्रदीप महाराज नागवडे, ह.भ.प.सौ. सुप्रियाताई साठे, ह.भ.प. अमोल महाराज बडाक, ह.भ.प. शितलताई साबळे यांची कीर्तन सेवा झाली. अखंड हरिनाम सप्ताह घुलेवाडी ता. संगमनेर दि. २४ ऑगस्ट २२ रोजी काल्याचे कीर्तन सेवा ह.प.भ संजय महाराज घोंगडे यांच्या कीर्तनाने संपन्न झाले.
त्या प्रसंगी भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे प्रदेश सदस्य रविंद्र संभाजीराव थोरात, जिल्हा परिषद सदस्य सिताराम राऊत, सरपंच दत्तु राऊत, उपसरपंच हरी ढमाले, ग्रामपंचायत सदस्य कुणाल पराड, चंद्रकांत शिरसागर, भाऊसाहेब सातपुते, रामनाथ महाराज राऊत, कान्हुबाबा राऊत, बाळासाहेब पानसरे, मच्छिंद्र ढमाले, रमेश राऊत, सखाराम राऊत, लक्षण निघुते, कैलास काशिद, पुंजा राऊत, वसंत राऊत, बस्तीराम ढमालेे, छावा क्रांतीवीर सेना जिल्हाध्यक्ष अशिष कानवडे, तालुकाध्यक्ष गणेश थोरात, शेतकरी तालुकाध्यक्ष नवनाथ राऊत, कामगार तालुकाध्यक्ष संदीप राऊत, महिला जिल्हाध्यक्ष राजश्री वाकचौरे, तालुका उपाध्यक्ष सचिन गांजवे, तरुण कार्यकर्ते बाजीराव पानसरे, विलास एकनाथ राऊत, स्वप्नील राऊत, गोपी राऊत, गणेश पानसरे, चंद्रकांत वाकचौरे, ऋषिकेश गुंजाळ, रवींद्र गिरी, रवींद्र पांडे, रवींद्र ढमाले, संदीप माने, सचिन गायकवाड, सागर दिघे, अक्षय राऊत, स्वरूप राऊत, शुभम मुर्तडक, कानिफनाथ डफकरी मंडळ, आजाद हिंद सेना तरुण मित्र मंडळ, साई स्वराज्य तरुण मित्र मंडळ, साई संकल्प तरुण मित्र मंडळ, युवा शक्ती तरुण मित्र मंडळ, सर्व समस्त ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.