अहिल्यानगर
गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने तांदूळवाडी व गोटूंबे आखाडा येथे वृक्ष वाटप व लागवड उपक्रम संपन्न
राहुरी | रमेश खेमनर : अहमदनगर येथील गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील गावांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये विविध फळ झाडे आणि देशी प्रकारच्या वृक्ष वाटपाचा व वृक्ष लागवडीचा उपक्रम गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष जगदीश शिंदे, किशोर पवार, सचिन कडुस (सारोळा कासार), रविंद्र गोरे (रवळगाव), सोनवणे सर (पिंपळा), दत्तात्रेय बार्वेकर (रांजणी), प्रशांत काळे, सुरेंद्र राठोड, तुकाराम जाधव, अविनाश फलके व इतर वृक्षमित्रांनी गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशन या सामाजिक संस्थेमार्फत गावोगावी जाऊन झाडे लावण्याचा उपक्रम राबविला आहे.
दि.२७ ऑगस्ट रोजी राहुरी तालुक्यातील तादुंळवाडी येथील जिल्हा परिषद शाळेत ग्रामस्थांना व शालेय विद्यार्थांना १०० फळ वृक्षाचे वाटप करण्यात आले. त्यानंतर याच फाउंडेशनमार्फत गोटुंबे आखाडा येथील जिल्हा परिषद शाळेत निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये ४८ विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रथम क्रमांक स्कूल बॅग, द्वितीय क्रमांक टिफिन बॉक्स (मेल्टॉन), तृतीय क्रमांक वॉटर बॉटल (मेल्टॉन) अशी पारितोषिके तसेच सर्व सहभागी विद्यार्थ्यांना १ फळ झाड भेट स्वरुपात देण्यात आले. विद्यार्थांना वृक्ष लागवडी बाबतीत मार्गदर्शन व वृक्षाचे महत्व गिरीकर्णिका ग्लोबल फाउंडेशनचे जगदीश शिंदे व किशोर पवार यांच्या वतीने करण्यात आले. तसेच गावातील शेतकरी व ग्रामस्थांना २०० फळ झाडांचे वितरण करण्यात आले.
यावेळी जगदीश शिंदे, किशोर पवार, तुकाराम जाधव, प्रशांत काळे, सुहास फलके, शरद पवार, गणेश शेवाळे, चि. घोडके या वृक्ष मित्रांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच यावेळी गोटुंबे आखाडा गावातील विश्वास बिज वृक्ष मित्र, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.