११ व १२ सप्टेंबर रोजी मतमाउली यात्रेनिमित्त कबड्डी स्पर्धा
श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : तालुक्यातील हरिगाव येथे मतमाउली यात्रेनिमित्त दि ११ व १२ सप्टेंबर रोजी संत तेरेजा क्लब हरिगाव यांच्या वतीने भव्य खुल्या पुरुष गट कबड्डी स्पर्धा संत तेरेजा चर्च ग्राउंड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. कबड्डी उद्घाटन प्रमुख धर्मगुरू सुरेश साठे यांच्या शुभ हस्ते व फा. डॉमनिक, रिचर्ड, सचिन व मुख्याध्यापिका ज्योती गजभिव, आ.लहू कानडे, प्रा शशिकांत गाढे, प्रा सुनील जाधव, प्रा विजयसिंह मिस्कीन यांच्या उपस्थितीत होईल. बक्षीस वितरण संचालक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे करण ससाणे, विश्वस्त साईबाबा संस्थान शिर्डी सचिन गुजर, विश्वस्त अनुराधा आदिक आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे.
कबड्डी स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक रु ४१०००/-संजय गायकवाड तर्फे अमोल शिंदे यांच्या वतीने चषक, व्दितीय रु ३१०००/-दगडू बोधक तर्फे व अमोल शिंदे तर्फे चषक, तृतीय रु २१०००/-दीपक साठे तर्फे व अमोल शिंदेतर्फे चषक, चतुर्थ रु १५०००/-वसंत पंडित वतीने व अमोल शिंदेवतीने चषक, पाचवे रु ७०००/-श्रीमती सुंदरबाई अंबादास गायकवाड तर्फे, सहावे, सातवे व आठवे प्रत्येकी रु ७०००/- सिजो पी सी वतीने तसेच श्रीमती चंद्रकला क्षत्रिय वतीने दोन प्रत्येकी १५००/- उत्कृष्ट रायडर, डिफेंडरसाठी, शिस्तबद्ध संघास रु ५०००/-प्रसाद देशपांडे वतीने रु ११००/-पी आय राजेंद्र दरंदले वतीने बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. सामन्याचे यु ट्यूब लाइव प्रक्षेपण पहावयास मिळणार आहे. संघांनी अध्यक्ष बी सी मंडलिक व सहकारी मो.क्र ९८५०९१६३९६, ८८०५७४८३९६, ९७६३४०४३२८, ९९२२७८०६९९ व ९५६१३२१२२५ वर नोंदणी, संपर्क करावा. कबड्डी स्पर्धकांनी भव्य पुरुष गट कबड्डी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन क्लब अध्यक्ष बी सी मांडलिक, उपाध्यक्ष दि एस गायकवाड, सचिव सुनील साठे, सहसचिव किशोर कदम व बाबुराव सूर्यवंशी, खजिनदार अशोक त्रिभुवन आदी पदाधिकारी यांनी केले आहे.