सामाजिक
देवळाली प्रवरा शहरात क्रिडा संकुल उभारावे – मेडीकल हेल्प टिमची मागणी
देवळाली प्रवरा प्रतिनिधी : देवळाली प्रवरा शहरात व्यायामशाळा आणि क्रिडांगणाची नितांत गरज असुन तरुणांचे उज्वल भविष्य लक्षात घेता नगर परिषदेने शहरात सर्व सोयींनी युक्त क्रिडा संकुल उभारावे, अशी मागणी मेडीकल हेल्प टिमच्या वतीने करण्यात आली आहे.
येथील व्यायाम शाळेत अद्यावत साहित्य उपलब्ध करुन पूर्णवेळ प्रशिक्षक नेमणुक करावी. खुल्या व्यायामशाळा वाड्या वस्तीवर उभाराव्यात तसेच नगर परिषद चषक या नावाने मैदानी खेळांच्या स्पर्धा आयोजित कराव्यात. अशा मागणीचे निवेदन देवळाली प्रवरा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अजित निकत यांच्याकडे देवळाली प्रवरा मेडीकल हेल्प टीमचे सनदी अधिकारी दत्ता कडू पाटील, आतंरराष्ट्रीय खेळाडू अप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, ऋषीकेश संसारे, प्रशांत काळे, विवेक मुसमाडे आदींनी केली आहे.