अहिल्यानगर
मुळा धरण येथे स्वच्छता मोहीम व वृक्षारोपण
अहमदनगर/ जावेद शेख : सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयातील राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी स्वच्छता मोहीम राबविली. मुळानगर येथे येणाऱ्या हौशी पर्यटकांनी केलेला कचरा, पाणी बाटल्या, काचा इत्यादी 140 विद्यार्थ्यांच्या हरित सेनेने चमेली बाग परिसरात बाटल्यांचा ढिग जमा केला. अत्यंत उत्साहाने हे काम विद्यार्थ्यांनी केले.
या प्रसंगी मुळा धरण जलसंपदा विभागाचे इंजि.कांबळे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. सावित्रीबाई फुले शिक्षण संस्थेचे सचिव महानंद माने यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला आणि स्वच्छता मोहिमेचे महत्त्व सांगितले. मुळाधरणावरील आयबी परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
या क्षेत्र भेटीचे आयोजन हरित सेनेचे सचिव बाळासाहेब डोंगरे यांनी मुख्याध्यापिका आशा धनवटे यांच्या मार्गदर्शनाखाली केले. या स्वच्छता मोहिमेत गौतम गायकवाड, हलिम शेख, करंडे मॕडम, पर्यवेक्षक अरूण तुपविहिरे, उपमुख्याध्यापक शमशुद्दीन इनामदार उपस्थित होते.