छत्रपती संभाजीनगर
संत सावता महाराज पुण्यतिथी निमित्त किर्तनाचे आयोजन
विलास लाटे/ढोरकीन : पैठण तालुक्यातील ढोरकीन येथे सालाबादाप्रमाणे याहीवर्षी श्री संत सावता महाराज यांची पुण्यतिथी बुधवार (दि.२७) रोजी संत सावता महाराज मित्रमंडळाच्या वतीने मोठया उत्साहात साजरी करण्यात येणार असुन या निमीत्त किर्तन, मिरवणूक व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
ढोरकीन येथे श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सकाळी ९ ते १० मिरवणूक काढण्यात येणार असून त्यानंतर दुपारी ११ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच रात्री ८ ते १० यावेळेत ह.भ.प. शिवलिला पाटील यांचे हरि किर्तन होणार आहेे. या कार्यक्रमास परीसरातील सर्व समाजातील बांधवांनी, भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन संत एकनाथ भजनी मंडळ यांच्या सहकार्याने संत सावता महाराज मित्रमंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.