महाराष्ट्र
डिझेल नसताना धावत आहेत राज्य परिवहन बस
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : प्रवाशांच्या सेवेसाठी असणाऱ्या राज्य परिवहन बसेस डिझेल उपलब्ध नसल्याने धावताना दिसत आहे. आज 20 ऑगस्ट रोजी सकाळी श्रीरामपूर पुणे बस क्रमांक एम एच 14-बी टी 745 ही 6 वाजता निघाली त्यात डिझेल अपुरे होते श्रीरामपूर डेपोत शिल्लक नव्हते. बस तारकपूर आली तेथे डिझेल घेण्यासाठी आली तेथे आधीच्या बसेस असल्याने डिझेल घेण्यासाठी जवळपास अर्धा तास गेला. त्यामुळे शाळेत नोकरीला लग्न कार्याला जणाऱ्या प्रवाशांची थोडी गैरसोय झाली. राज्य परिवहन महामंडळाला डिझेलचा तुटवडा कसा झाला ? आधी बस निघण्यापूर्वी एक दिवस आधी व्यवस्था का केली जात नाही ? असा प्रश्न पडतो. बस वाहक महिलेने प्रवाशांना सांगितले डिझेल मिळाले नसते तर परत जावे लागले असते प्रवाशांना दुसऱ्या गाडीत्त पाठविले असते. पण दुसऱ्या गाडीत जागा मिळते की नाही हे सांगता येत नाही. त्यात अजून उशीर झाला असता याकडे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, याची दक्षता विभाग नियंत्रकांनी घेणे गरजेचे आहे. अन्यथा प्रवासी खाजगी गाड्याचा आधार घेतील असे दिसते.