सामाजिक
बाभुळगाव येथे अमृतमोहोत्सवी स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्रामस्थांनी घेतली व्यसनमुक्तीची शपथ
राहुरी विद्यापीठ : तालुक्यातील बाभुळगाव येथे अमृतमोहोत्सवी स्वातंत्रदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात उपस्थित ग्रामस्थांनी स्वतःला व गावाला तंबाखू मुक्त व व्यसनमुक्त करण्याची शपथ घेत अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे.
ग्रामपंचायत कार्यालय बाभुळगाव व जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात शालेय विद्यार्थी व ग्रामस्थ ध्वजारोहनसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी अंतर्गत, कृषी महाविद्यालय भानसहिवरे येथिल विद्यार्थीनी कु. सुवर्णा भारत थोरात हिनेदेखिल स्वातंत्रदिनाच्या या कार्यक्रमामध्ये सहभाग नोंदवला. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे लष्करात कार्यरत असलेले जवान संदीप वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
वाघमारे यांनी उपस्थित विद्यार्थी व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यानंतर सुवर्णा थोरात हिने कोरोना महामारीच्या काळात आपला जीव गमवावा लागणारे कोरोना योद्धे, गावकरी या सर्वांच आठवण करून देत सर्वांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच कोरोना महामारीच्या काळात घ्यावयाची काळजी या सर्वाची माहिती सांगितली. या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे संदीप वाघमारे, गावच्या सरपंच सौ. मुक्ताबाई गिऱ्हे, उपसरपंच सौ.राजश्री माने, प्रगतशील शेतकरी भारत थोरात, अशोक उंडे, गोरक्षनाथ गिऱ्हे, विठ्ठल डव्हाण, रामदास चितळकर इ. मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.