महाराष्ट्र

जिल्ह्यातील पेन्शनधारकांचा साखळी उपोषणास पाठींबा

पेन्शनधारकांचे बुलढाणा येथे सुरु असलेल्या साखळी उपोषणास श्रीरामपूर, राहुरी, श्रीगोंदा व कोपरगाव येथील पेन्शन धारकांनी पाठींबा दिला.

श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे : अहमदनगर जिल्ह्यातील इपीएस ९५ पेन्शन धारकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ बुलढाणा येथे पेन्शनधारकांच्या मागण्याबाबत ऊन, वारा, पाऊस, कोरोना महामारी असताना सूरु असलेल्या साखळी उपोषणास ९६२ व्या दिवशी एकदिवसाचे लाक्षणिक उपोषण करून आपला पाठींबा दिला आहे.‌ हे साखळी उपोषण मागण्या मान्य होईपर्यंत सुरूच राहणार असल्याचे इपीएस ९५ राष्ट्रीय संघर्ष समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राउत यांचा सत्कार करताना राहता तालुकाध्यक्ष सुकदेव पा.आहेर व पदाधिकारी

    अहमदनगर जिल्ह्यातून श्रीरामपूर, श्रीगोंदा, राहुरी, लोणी, संगमनेर, कोपरगाव आदी ठिकाणावरून परदेशी संघटन सचिव व जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष पोखरकर, उपाध्यक्ष संपत समिंदर, नारायण होन, अशोक देशमुख, किशोर भांगे, एस के सय्यद, भगवंत वाळके, बापूराव बहिरट, विनायक लोळगे, सुकदेव आहेर, सुलेमान शेख, बी आर चेडे आदी पेन्शनधारक बुलढाणा येथे गेले व आपल्या बंधू भगिनीच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत यांनी पेन्शनधारकांच्या मागणीबाबत ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खा.हेमा मालिनी समवेत पी एन पाटील, वीरेंद्रसिंह राजावत आदींच्या शिष्टमंडळाने घेतलेली भेट व त्यानंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, अर्थ राज्यमंत्री यांच्या बरोबर झालेल्या सकारात्मक चर्चेची सविस्तर माहिती यावेळी दिली. पेन्धनधारकांचा प्रश्न लवकर मार्गी लागणार असल्याचे सांगितले. आपला संघटीत लढा पुढे न्यायचा आहे. देशभर संघटनाचे जाळे पसरल्याने संघटना बळकट झाली. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत यांनी संपतराव समिंदर यांची NAC अहमदनगर जिल्हाध्यक्षपदी,व नारायण होन यांची उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाल्याचे पत्र दिले. त्यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष राउत यांचा संघटना वतीने सुकदेव आहेर यांनी सत्कार केला. राष्ट्रीय अध्यक्ष राउत यांनी सुभाष पोखरकर यांची प्रादेशिक संघटकपदी निवड झाल्याबद्दल सत्कार केला. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोक राउत, राष्ट्रीय मुख्य सल्लागार डॉ पी एन पाटील, सुभाष पोखरकर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. सर्वोच्च न्यायालयात १७ ऑगस्ट रोजी क्र १ असल्याने प्रलंबित दाखल केलेल्या व इपीएफओ ने दाखल केलेली फेरविचार याचिका आदींची सुनावणी सुरु होणार असल्याचे यावेळी सांगितले.

Related Articles

Back to top button