सामाजिक

श्री संत शिरोमणी सावता महाराज पुण्यतिथीनिमित्त मोफत दंतरोग तपासणी शिबीर संपन्न

राहुरी प्रतिनिधी : श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त सावता माळी युवक संघ अहमदनगर जिल्ह्याच्या वतीने राहुरी येथील नगरपालिकेच्या ज्येष्ठ नागरिक हॉल मध्ये डॉ. सुदर्शन गोरे यांच्या वतीने मोफत दंतरोग तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र वाडेकर होते. कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर सावता माळी युवक संघाचे संस्थापक अध्यक्ष सचिन गुलदगड, मराठा महासंघाचे शिवाजी डौले, पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, राहुरीचे प्रथम नागरिक अनिल कासार, स्वप्नील भास्कर दिव्यांग प्रहार संघटनेचे मधुकर घाडगे, जिल्हाध्यक्ष अशोकराव तुपे, मच्छिंद्र गुलदगड, यशवंतराव डावखर, सुनील गुलदगड, प्रशांत शिंदे, सूर्यवंशी सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी राज्यमंत्री नामदार प्राजक्त तनपुरे म्हणाले की सावता महाराजांचे कार्य महाराष्ट्र राज्यासाठी कायम प्रेरणादायी आहे. त्यांनी समाजातील तळागाळातील उपेक्षित वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मोठे कार्य उभे केले आहे. सावता माळी युवक संघाचे कार्य देखील उल्लेखनीय असून त्यांचे नेहमीच सामाजिक उपक्रम सुरू असतात. आज देखील सावता महाराज यांच्या ७२६ व्या पुण्यतिथी निमित्त समाजातील गरजवंतासाठी मोफत दंत तपासनी शिबिराचे आयोजन केले. हि तालुक्याच्या दृष्टीने मोठी कौतुकास्पद बाब आहे. तालुक्याचे लोकप्रतिनिधी या नात्याने श्री संत सावता माळी युवक संघासाठी  सर्वतोपरी सहकार्य करू, अशी ग्वाही दिली. यावेळी सचिन गुलदगड यांनी श्री संत शिरोमणी सावता महाराजांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकला.
    यावेळी नगरसेविका सौ संगीताताई आहेर, सुनंदा दहातोंडेे, बाबासाहेब सत्रे, अशोक आहेर, ऋषिकेश तनपुरे, रवी आहेर, जीवन गुलदगड, अजिंक्य मेहेत्रेे, दिलीपराव आघाव, अतुल तनपुरे, संजय संसारे, दीपक साखरेे, दिलीप वाकचौरेे, बाळासाहेब लगेे, संकेत तनपुरे, रवींद्र भुजडीी, सुनील भुजाडी यांच्यासह सावतामाळी युवक संघ व दिव्यांग प्रहार संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या शिबिराचा सुमारे ऐंशी दंत रुग्णांनी लाभ घेतलाा. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपासाहेब ढोकणे यांनी केले तर आभार मधुकर घाडगे यांनी मानले.

Related Articles

Back to top button