सामाजिक
भूमि फाउंडेशनच्या माध्यमातून पुरग्रस्तांना मदत
श्रीरामपूर/ बाबासाहेब चेडे – भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या सामाजिक संस्थेच्या वतीने चिपळूण परिसरातील पोपरे या गावातील काही ठिकाणी दरड कोसळल्यामुळे अनेक जण मातीत अडकुन मृत्युमुखी पडले आहेत. तसेच अनेक गुरेढोरे देखील मातीत अडकुण मृत्युमुखी पडले आहे. त्याचबरोबर या गावात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. या घटनेने या गावात जीवनमान विस्कळीत झालेले आहे. याची दखल घेत भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या वतीने गावातील सर्व नागरिकांना अन्नधान्य तसेच वस्त्र इत्यादी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित संस्थेचे अध्यक्ष कैलास पवार, राहुल पाटील, रोहित माने, संकेत शेलार, शिवतेज, गावचे पोलिस पाटिल व इतर ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी गावकऱ्यांनी सदर मदतीचे समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू अन्नधान्य आणि किराणा मिळतच आहे. परंतु यापेक्षा संसार रुपी वस्तू जर आम्हाला मिळाल्या तर आमचा संसार लवकर उभा राहू शकतो, अशी मागणी भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य या संस्थेकडे सदर नागरिकांनी केली आहे. सदर मागणीसाठी भूमि फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्थेच्या वतीने पुरग्रस्तांना मदतीचे आव्हान करण्यात आले आहे.