अहिल्यानगर
छावा क्रांतिवीर सेनेचा नगर जिल्हा प्रशासनाला ईशारा
“राहता येथील महाराजांचा अश्वारूढ पुतळा नियोजित जागी पुढील दोन महिन्यात बसवा अन्यथा छावा क्रांतीवीर सेना स्वतः त्या जागी पुतळा बसवणार, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष करण गायकर यांनी दिला आहे.”
अहमदनगर प्रतिनिधी : राहता शहरामध्ये गेल्या १८ वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा धान्य गोडाऊन मध्ये कैद करून ठेवण्यात आलेला आहे.सदर पुतळा लवकरात लवकर बाहेर काढावा,योग्य त्या नियोजीत ठिकाणी पुतळ्याचे पुनर्वसन करावे यासाठी छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ हे गेल्या अनेक दिवसांपासून पाठपुरावा करत होते.यासंबंधित निवेदन वाघ यांनी स्थानिक प्रशासनापासून ते मुख्यमंत्री,राज्यपाल अन्य मंत्री गण यांना दिलेले आहे.
परंतु प्रशासनाने या संदर्भात कुठलेही पाऊल न उचलल्यामुळे दि.१९ जुलै,२०२१ सोमवार रोजी छावा क्रांतीवीर सेनेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज कॉम्प्लेक्स,राहता या ठिकाणी आंदोलन करण्यात आले व प्रशासनाला धारेवर धरण्यात आले.संघटनेच्या गंबीर इशाऱ्यानंतर स्थानिक प्रशासनाला जाग आली आणि प्रशासनाने लेखी पत्र देत प्रशासनाच्या वतीने लवकरच आम्ही योग्य ती कार्यवाही करू असे आश्वासन दिल्यानंतर सदर आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले.
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष करण गायकर व प्रदेश कार्याध्यक्ष विश्वनाथ वाघ यांनी आपल्या भाषणातून प्रशासनावर कडकडून टीका करतांना ईशारा दिला आहे की दोन महिन्याच्या आत जर छत्रपतींच्या पुतळ्याच्या संदर्भात निर्णय घेतला नाही तर सदर अश्वारुढ पुतळ्याचे योग्य त्या ठिकाणी संघटना स्वतःच्या ताकदीवर पुनर्वसन करेल तसेच प्रशासन आणि सरकार यांच्या विरोधात यापेक्षाही मोठे जनआंदोलन उभे केले जाईल, आजचा फक्त ट्रेलर होता याहीपेक्षा भविष्यातील आंदोलन प्रशासनाला परवडणारे नसेल मग प्रशासनाने आंदोलन थोपविण्यासाठी कितीही ताकद लावली तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा योग्य त्या जागेवर बसविल्या शिवाय छावा क्रांतिवीर सेनेचे पदाधिकारी गप्प बसणार नाहीत मग त्यावेळी प्रशासनाने आमच्यावर कोणताही गुन्हा दाखल केला त्याची तमा आम्ही बाळगणार नाही. कारण छत्रपती शिवाजी महाराज ही अखंड महाराष्ट्राचे नव्हे या देशाची जगाची अस्मिता आहे आणि त्या अस्मितेला जर असे डांबण्याचा प्रकार करीत असेल तर हे कदापि सहन केले जाणार नाही,त्यावेळेस जे काही परिणाम होतील या सर्वास नगर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी,शासकीय अधिकारी हे यास सर्वस्वी जबाबदार असतील.
नगर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनाही यावेळी आव्हान करण्यात आले की आपण इतक्या दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करत आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा गोडाउन मध्ये कैद करून ठेवला जातो यापेक्षा मोठे दुर्दैव या राजकारण्यांचे नाहीत,कलंकित राजकारणी जे छत्रपतींची अस्मिता जपू शकत नाही त्यांना या महाराष्ट्रात राजकारण करण्याचा कुठलाही अधिकार नाही अशा शब्दात यावेळी सर्व राजकीय नेत्यांचा जाहीर निषेध करण्यात आला. शासनाला दोन महिने कालावधी दिलेला आहेत तेव्हा योग्य ती पाऊले उचलावी नाही तर संघर्ष अटळ आहे.यावेळी झालेल्या आंदोलनात छावा क्रांतिवीर सेनेचे प्रदेश,विभागीय,जिल्हा कार्यकारणी चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.