राजकीय
राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी चंद्रवंशी
हिंगोली प्रतिनिधी : राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी राजु चंद्रवंशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजु चंद्रवंशी यांना जिल्हा अध्यक्ष बालाजी घुगे यांनी नियुक्ती पत्र दिले आहे.
जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्याकरीता पदाधिकाऱ्यांकडुन जोमाचे प्रयत्न होत आहेत. त्याच निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष बालाजी घुगे यांच्याकडुन नुतन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र दिले जात आहे. या निवडीबद्दल राजु चंद्रवंशी यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.