सामाजिक

अनुराधा आदिक यांचा वाढदिवस ऑक्सिजन देणारे वृक्ष लावून साजरा

श्रीरामपूर / बाबासाहेब चेडे : श्रीरामपुरच्या लोकप्रिय नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांचा वाढदिवस ऑक्सिजन देणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करून साजरा करण्यात आला.त्यांचा अभिष्टचिंतन सोहळा अतिथी कॉलनी फेमस बाजार येथे फटाक्यांची आतषबाजी व केक कापून साजरा करण्यात आला.केकवर “ताईसाहेब पुन्हा” लिहिल्याने मोठा आनंद झाला त्यावेळी वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी विविध विकास कामाचे शुभारंभ झाले.शहरात घर तेथे रस्ता,म्हणून त्यांचे काळात श्रीरामपूर शहराची ओळख,व शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी केलेले प्रयत्न यामुळे नागरिक फार समाधानी झाले आहेत. स्व गोविंदराव आदिक यांचा राजकीय वारसा पुढे चालवीत आहेत.त्याचा प्रत्यय आज यानिमित्त दिसला.ऑक्सिजन देणारी ५०० झाडे लावण्याचा निर्धार के के आव्हाड यांनी केला.यावेळी नगराध्यक्षा आदिक म्हणाल्या की कोरोना महामारी चालू आहे.वृक्षारोपण हीच सध्या गरज आहे.त्यांचे संगोपन सुद्धा करावे.त्यांच्या हस्ते झाडांची पूजा करण्यात आली.
यावेळी नगरसेवक प्रकाश ढोकणे म्हणाले मागील काळात शहर केले होते भकास व ताई नगराध्यक्षा झाल्यापासून शहराचा केला विकास व विकास कामाचा आढावा सांगितला. यावेळी नगरसेवक प्रकाश ढोकणे,फेमस बाजार उद्योजक के के आव्हाड, वंदनाताई मुरकुटे, मानवता कल्याणचे अनिल साळवे, रंगनाथ माने, डॉ बबनराव आदिक, डॉ बाबुराव उपाध्ये, भाऊसाहेब वाघ, अर्जुन आदिक, नगरसेवक राजेंद्र पवार, हंबीरराव नाईक, हिंगणीकर, अधिक जोशी, उमेश तांबडे, सुभाष लिंगायत, सुकदेव सुकळे आदि तसेच आशीर्वादनगर, सिद्धार्नगर मित्रमंडळ आदी संघटना यांनी उपस्थित राहून नगराध्यक्षा यांचा सत्कार केला.

Related Articles

Back to top button