महाराष्ट्र

शिवशंभू छावा प्रतिष्ठानचा पदनियुक्ती व कोरोना योध्दा पुरस्कार सोहळा संपन्न

राहुरी प्रतिनिधी : श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती या ठिकाणी शिवशंभो छावा प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना महामारीच्या काळात ज्या शिवभक्तांनी योगदान दिले त्यांना कोरोना समाजरक्षक योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. यावेळी पुणे, अहमदनगर तसेच सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य महिला कार्यकर्त्यांनी शिवशंभू छावा प्रतिष्ठानमध्ये प्रवेश केला. संस्थापक अध्यक्ष भरत पवळे, महिला प्रदेशाध्यक्ष संध्याताई शिंदे, राज्य संपर्कप्रमुख सतीश सौदागर, राज्य कार्याध्यक्ष राहुल गोरे, राज्य सचिव मनोहर गोरगल्ले, खेड तालुकाध्यक्ष सचिन राक्षे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीस फुल हार घालून मानवंदना देण्यात आली.यावेळी उपस्थितीत‌ पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आझाद तरुण मित्र मंडळ रांजणगावच्या वतीने कोराना योद्धा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. कोरोना योद्धा पुरस्कार संध्याताई शिंदे, भरत पवळे, सतीश सौदागर, मनोहर गोरगल्ले, सचिन मैंद, सचिन राक्षे, श्री खेडकर आदी मान्यवरांना देऊन सन्मानित करण्यात आले.

    शिव शंभू छावा प्रतिष्ठानचे संपर्कप्रमुख सतीश सौदागर व पुणे जिल्हाध्यक्ष सचिन मैंद यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्ह्यातील सोहळा पार पडला. यामध्ये राज्य उपाध्यक्षपदी गणेश सांडभोर, शिरूर तालुका उपाध्यक्षपदी गणेश साबळे, चाकण शहर कार्याध्यक्षपदी राजाराम वाडेकर, ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षपदी मीनाताई खेडकर, रांजणगाव महिला शहराध्यक्ष पदी मंगलताई धसाळ, शिरूर तालुका महिला उपाध्यक्ष उज्वलाताई वाघ, श्रीगोंदा शहराध्यक्ष ऋषी आढाव, सोलापूर युवा जिल्हाध्यक्ष अक्षय शिंदे, मोहोळ तालुका उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील आदी पदाधिकाऱ्यांच्या निवडी प्रतिष्ठानचे राज्य कार्यकारिणी सदस्य यांच्या हस्ते करण्यात आल्या.

    यावेळी उद्योगपती काळुराम नामदेव मैंद, रामदास धोंडिबा लांडे, तुकाराम जयवंत गलांडे, दत्तात्रय बबन वाघुले,किसन सोपान बत्ते, अहमदनगर शहर जिल्हा उपाध्यक्ष कैलास मल्लनाथ, राहुरी तालुकाध्यक्ष महेश मोरे, सौ गोरे मॅडम, सौ प्रिया सौदागर, सौ शोभाताई मैंद, अमृता दरवे, आजिनाथ कुंचळ, नवनाथ कुळल्ला, बाळासाहेब शितकळ आदी कार्यकर्ते व मान्यवर तसेच रांजणगाव येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Back to top button