महाराष्ट्र

देशांतर्गत जहाज विधेयक लोकसभेत संमत

मुंबईआंतरदेशीय जहाज  विधेयक २०२१ आज लोकसभेत मंजूर करण्यात आलं. केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्वांनंद सोनोवाल यांनी गेल्या गुरुवारी हे विधेयक सभागृहात मांडले होते.या विधेयकान्वये देशभरात, राज्यांचे वेगवेगळे कायदे असण्यापेक्षा देशाचा एकच, एकीकृत कायदा लागू होऊ शकेल. या कायद्याअंतर्गत देण्यात आलेले नोंदणी प्रमाणपत्र देशात कुठेही वैध समजले जाईल आणि त्यानंतर राज्यांच्या वेगळ्या परवानग्यांची गरज पडणार नाही.या विधेयकामुळे, जहाजे आणि त्यांच्यावरील कर्मचारी यांच्या माहितीचा एक मध्यवर्ती डेटाबेस इलेक्ट्रॉनिक पोर्टलवर तयार होऊ शकेल.या विधेयकानुसार, जहाजांना स्वस्त आणि सुरक्षित दिशादर्शन सुविधा, जीविताची तसेच मालाची संरक्षण सुविधा देण्याचा प्रस्ताव असून देशांतर्गत जलमार्ग आणि दिशादर्शन विषयक कायद्यांची एकसमान अंमलबजावणी करण्याची तरतूद आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button