महाराष्ट्र
मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडुन देवळाली मेडिकल हेल्प टीम चे आभार
देवळाली प्रवरा – देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमने मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित केले होते.या कार्यक्रमाची मुख्यमंत्री कार्यालयाकडुन दखल घेत आभार व्यक्त करण्यात आले असल्याचा ई-मेल आप्पासाहेब ढुस यांना प्राप्त झाला आहे. या बद्दल सविस्तर माहिती अशी की, रोटरी ब्लड बँक राहुरी यांच्या सहकार्याने देवळाली प्रवरा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा उदंड असा प्रतिसाद मिळाला. याप्रसंगी सनदी अधिकारी दत्तात्रय कडू,आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस, प्रशांत कराळे, अमजद इनामदार, अनिस शेख, वर्षा संसारे, ऋषीकेश संसारे, डॉ. सुनील कदम, सागर सोनवणे आदी मेडिकल हेल्प टीम चे सदस्य हजर होते.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री महोदयांनी कोरोना काळात केलेले कार्य व जनतेला दिलेला धीर पाहता त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देवळाली मेडिकल हेल्प टीमच्या वतीने या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.सोशल मीडियाच्या माध्यमातून रक्तदान शिबीर बाबतची माहिती मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत पोहचली. त्याबद्दल आज मुख्यमंत्री कार्यालयाने देवळाली मेडिकल हेल्प टीमचे सदस्य तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू आप्पासाहेब ढुस यांना ई-मेल द्वारे आभार व्यक्त करणारा संदेश प्राप्त झाला.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत आभार संदेश पाठविल्याने देवळाली प्रवरा मेडिकल हेल्प टीमचा सामाजिक कार्याप्रति उत्साह द्विगुणित झाला असून टीमच्या सर्व सदस्यांसोबत, रोटरी ब्लड बँक, कर्मवीर अकॅडमी आणि ज्या रक्तदात्यांनि रक्तदान केले तसेच हे शिबीर यशस्वी होण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले.आप्पासाहेब ढुसआंतरराष्ट्रीय खेळाडू