महाराष्ट्र
नाथसागराने पांघरला हिरवा शालू
रविवारी दि.२५ जुलै २०२१ रोजी सायंकाळी पैठणचे नाथसागर परिसरात टिपलेली ही काही थेट मनोहारी दृश्य-क्षणचित्रे.
पैठण : गेल्या पंधरा दिवसांपासून कमी-जास्त संततधार पाऊस पडत आहे.त्यामुळे सगळीकडे हिरवळ पसरली आहे. आशीया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असलेल्या १५२२ फुट पाणी साठवण क्षमतेच्या जायकवाडी धरण व परिसरात विश्रांती घेऊन कमी-अधिक संततधार पाऊस पडतो आहे. त्यामुळे या परिसरातील वृक्ष संपदेला पालवी फुटली आहे. चौफेर हिरवाईची चादर पांघरलेला “नाथसागर” निसर्गरम्य समाधान देऊन जात आहे.लगतची डबडबलेली गोदावरी नदी या आनंदात आणखी भर टाकणारी ठरत आहे.