राजकीय
मुसळवाडी योजनेच्या अध्यक्षपदी धुमाळ तर उपाध्यक्षपदी जाधव यांची निवड
व्हिडीओ : मुसळवाडी ९ गांव योजनेच्या अध्यक्षपदी धुमाळ यांची निवड झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना.
राहुरी (प्रतिनिधी) राजेंद्र आढाव : राहुरी तालुक्यातील मुसळवाडी ९ गांव प्रादेशिक पाणी योजनेच्या अध्यक्षपदी अमृत धुमाळ तर उपाध्यक्षपदी द्वारकानाथ जाधव यांची निवड करण्यात आली आहे.
मुसळवाडी ९ गांव प्रादेशिक पाणी योजनेचे अध्यक्ष अमृत धुमाळ…
राहुरी पंचायत समितीच्या स्व. डॉ.दादासाहेब तनपुरे सभागृहात हि निवडुन प्रक्रीया आयोजित करण्यात आली होती.अध्यक्षपदासाठी अमृत धुमाळ आणि सर्जेराव साळूंके यांनी तर उपाध्यक्ष पदासाठी द्वारकानाथ जाधव आणि वाल्मिक गायकवाड यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते.गुप्त पद्धतीने हि निवडणूक पार पडली त्यामध्ये धुमाळ यांना ९ मते तर सोळुंके ७ मते व उपाध्यक्षपदासाठी जाधव यांना १० मते तर वाल्मिक गायकवाड यांना ६ मते मिळाली.निवडणूक निर्णय अधिकारी अनंत परदेशी यांनी अध्यक्षपदी अमृत धुमाळ तर उपाध्यक्षपदी द्वारकानाथ जाधव यांची निवड घोषीत केली.निवड प्रक्रियास विस्तार अधिकारी दळे आणि ग्रामविकास अधिकारी तथा सचिव सुरेश डोंगरे यांनी सहाय्य केले. यावेळी सारिका घोलप, सुभाष पवार, शारदा आढाव, बबाबाई माळी, रामेश्वर पवार,निता घारकर, श्रीकांत जाधव, कविता जाधव ,सविता कोळपे, शिवाजी पवार, सुधाकर पवार, बापु आघाव या सदस्यांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग नोंदवला.