कृषी

राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे महाविकास आघाडी सरकारचे दुर्लक्ष

क्रांतीसेनेचे मुख्यमंत्र्यांसह, संबंधित मंत्री व खात्यांच्या सचिवांना ई-मेल द्वारे निवेदन

राहुरी प्रतिनिधी : महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबत महाराष्ट्र बंद ठेवला. परंतु राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे सरकारचे पुर्णतः दुर्लक्ष झाल्यामुळे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या वतीने शेतकर्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, कृषिमंत्री दादाजी भुसे आदींसह संबंधित विभागाच्या सचिवांना मागण्यांचे निवेदन पाठविण्यात आले आहे.
       
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाविकास आघाडी सरकारने उत्तर प्रदेश मधील घटनेचा निषेध करत ११ आक्टोबर २०२१ रोजी महाराष्ट्र बंद केला. याबाबत सरकारचे शेतकरी या नात्याने आभार व्यक्त केले आहे. यातुन आपले सरकार हे शेतकऱ्यांचे कैवारी आहे, हे सिद्ध झाले आहे. परंतु अखिल भारतीय क्रांतीसेनेनेच्या माध्यमातून गेल्या वर्ष- दीड वर्षांपासून राज्यातील शेतकऱ्यांच्या शेतजमीनी शासकीय स्तरावर मोजणी करण्यासाठी, दुध उत्पादक शेतकऱ्यांच्या दुधाला दुध दर वाढीसाठी, राज्यातील शेतकऱ्यांना मोफत वीज पुरवठा करण्याबाबत, राज्यातील शेतकऱ्यांना मोफत सर्व प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मिळण्याबाबत, राहुरी तालुक्यातील कोंढवड-तांदुळवाडी येथील मुळा नदीवर कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी, राहुरी तालुक्यातील कांदा बियाणे फसवणूक प्रकरणी कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळुन संबंधित बियाणे कंपनीवर कारवाई करण्यासंदर्भात वेळोवेळी निवेदनाद्वारे शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मागण्या केल्या आहे. वरील शेतकऱ्यांच्या समस्यांसंदर्भात गेली एक-दीड वर्षांपासून वेळोवेळी पाठपुरावा करून ही महाविकास आघाडी सरकारने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली दिसुन येत नाही. आपण पाठवलेल्या पत्र व्यवहार वरून संबंधित खात्यांकडुन कुठलिही कारवाई आतापर्यंत झाली नाही. आपल्या सरकारने उत्तर प्रदेशातील घटनेबाबत महाराष्ट्र बंद ठेवला. परंतु राज्यातील शेतकरी कोरोना काळापासून शेत मालाला योग्य हमीभाव व शेतीपुरक व्यवसायाला मिळत असलेल्या दरांमुळे तसेच अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने आर्थिक अडचणीत सापडला आहे. या सर्व गोष्टींमुळे बर्याच शेतकऱ्यांनी स्वतः ची जीवनयात्रा संपवली. राज्यातील शेतकरी मरणयातना भोगत असताना आपल्या सरकारने पिकांना पाण्याची गरज असताना भर उन्हाळ्यात शेतीपंपाचे वीज रोहित्र बंद करुन वीज बिलाची पठाणी वसुली केली. दुध दराबाबतही आपल्या सरकारने योग्य निर्णय घेतला नाही. त्यामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेतकऱ्यांच्या या प्रश्नांकडे आपल्या सरकारचे पुर्णतः दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे.
या प्रश्नांकडे महाविकास आघाडी सरकारने लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, शिक्षक आघाडीचे अध्यक्ष भागचंद औताडे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ, संघटक जालिंदर शेडगे, जिल्हाध्यक्ष नवनाथ ढगे, सुभाष दरेकर, बाळासाहेब भोर, संदीप उंडे, भगवान पेरणे, शेखर पवार, सचिन गागरे, संदीप डेबरे, विठ्ठल शेजुळ, अविनाश कुरूमकर, अमित कोल्हे, शब्बीर शेख, गोकुळ नेटके, ऋषिकेश निबे, अंकुश भोसले, भाऊसाहेब पवार, नितीन खांदे, रोहीत शेटे, शाम तारडे, सुनील कोल्हे, सोमनाथ वने, हर्षद धोंडे आदींनी केली आहे.

Related Articles

Back to top button