अहिल्यानगर
भाजप शहराध्यक्षपदी कदम
भाजप शहराध्यक्षपदी कदम यांना नियुक्ती पत्र देताना माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम
राहुरी फॅक्टरी : येथील सामाजिक,सांस्कृतिक व धार्मिक कार्यात सतत अग्रेसर असलेल्या वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठान चे संस्थापक वसंतराव कुंडलिक कदम यांची राहुरी फॅक्टरी शहराध्यक्ष पदी भाजपाचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांतजी पाटील, माजी आमदार चंद्रशेखर कदम व देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगराध्यक्ष सत्यजित पाटील कदम यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली.
कदम यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी तरुणांना संघटित करून अनेक आंदोलने यशस्वी केले आहे. राहुरी फॅक्टरी परिसरात कदम यांना मानणारा मोठा मित्रपरिवार असल्याने भाजपाचे या परिसरात मोठे वर्चस्व प्रस्थापित होणार असल्याचे बोलले जात आहे.आंदोलनाच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांची,विद्यार्थ्यांचे प्रश्न गेल्या पंधरा वर्षांपासून कुठलेही पद नसताना त्यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला आहे.कदम यांचे संघटन कौशल्य व सामाजिक कार्य करण्याची धडपड नगराध्यक्ष सत्यजित पा कदम यांनी ओळखून त्यांच्यावर शहराध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविली आहे.तरुणांचे संघटन व स्वच्छ प्रतिमा असलेल्या युवकाला राहुरी फॅक्टरी भाजप शहराध्यक्ष पदाची जबाबदारी दिल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून येणारी नगरपालिका निवडणुकीमध्ये राहुरी फॅक्टरी शहरात पक्षाला निश्चित फायदा होईल,अशी खात्री कार्यकर्त्यांना आहे.
” नगराध्यक्ष सत्यजित पा कदम यांनी गेल्या साडे चार वर्षात देवळाली नगरपालिकेत जी विकासकामे केली आहे.सत्यजित कदम यांच्या काम करण्याच्या पद्धतीवर प्रभावित होऊन भाजपात जाण्याचा निर्णय घेण्यात आला.”
वसंत पा कदम
(शहराध्यक्ष भाजपा, राहुरी फॅक्टरी शहर )