राजकीय
एकलव्य बहुजन पक्षाची बैठक सिन्नर येथे संपन्न
राहुरी प्रतिनिधी/ राजेंद्र आढाव : एकलव्य आदिवासी बहुजन पक्ष कमिटीची बैठक सिन्नर येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रेवननाथ जाधव हे होते. राष्ट्रीय पक्षाचे महासचिव डॉ. राहुल आहिरे,महाराष्ट्र संघटक अध्यक्ष विष्णू नाईक,नाशिक जिल्हा अध्यक्ष अशोक नाईक, नाशिक जिल्हा उपाध्यक्ष अशोक पवार, जिल्हा संपर्क प्रमुख तुषार आहेर, जिल्हा संघटक अध्यक्ष चंद्रशेखर रोकडे, जिल्हा कार्य अध्यक्ष आप्पाजी माळी, माधव भांगरे, सिन्नर तालुकाध्यक्ष रामनाथ बर्डे, मरळ नाशिक जिल्हा कमिटीचे पदाधिकारी व सर्व सिन्नर तालुका कमिटीचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत तुषारजी आहिरे साहेब यांची महाराष्ट्र राज्य संपर्क प्रमुख, महिला प्रदेशाध्यक्ष सौ. शुषमा बोरसे,सिन्नर शहर अध्यक्ष सुदाम तांबे, सिन्नर,वावी प्रभारी महिला तालुकाध्यक्ष सौ. बर्डे ताई, सिन्नर तालुका प्रभारी उपाध्यक्षपदी सौ.जीजाताई पिंपळे, इगतपुरी तालुकाध्यक्षपदी सचिन मोंढे आदींच्या निवडी करण्यात आल्या आहेत.
“आदिवासी बहुजन समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी एकलव्य आदिवासी बहुजन पार्टी पक्षाच्या व आदिवासी समाज्याच्या पाठीशी उभे राहत तत्पर जोमाने कार्य करील अशी ग्वाही पक्षाचे अध्यक्ष रेवणनाथ जाधव यांनी दिली.”