सामाजिक

केंदळ ग्रामस्थांचा गांधीगिरीचा इशारा

व्हिडीओ : केंदळ ग्रामस्थांचा तक्रारीचा पाढा…

आरडगांव प्रतिनिधी राजेंद्र आढाव : केंदळ बुद्रुक प्राथमिक आरोग्य केंद्र ते तारडे वस्ती पर्यंत रस्ताची अत्यंत दुरावस्था झाल्याने या संदर्भात निमंत्रण पत्रिकासह मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे नाव रस्त्याला देऊन नामकरण विधी धार्मिक विधिवत पूजा करून अनोख्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे.

       राहुरी तालुक्याच्या पुर्व भागात पावसाळ्यात रस्त्याची अत्यंत दुरावस्था होत‌ असल्यामुळे केंदळ बुद्रुक येथे मंगळवारी २७ जूलै रोजी सकाळी १० वा. निमंत्रण पत्रिकासह मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचे नाव रस्त्याला देऊन नामकरण विधी धार्मिक विधिवत पूजा करून अनोख्या पद्धतीने गांधीगिरी आंदोलन करण्यात येणार आहे. तरी या रस्त्याची संबंधित अधिकार्यांनी पाहणी करून रस्ता दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवक आघाडी तालुका प्रमुख विशाल तारडे,हरिभाऊ डोंगरे, समीर तारडे,सुनिल गोसावी,रामेश्वर कैतके, सुरेश मच्छिंद्र तारडे, लहू तारडे, रंगनाथ कैतके,भाऊसाहेब मांगुडे, नवनाथ भोसले ,नामदेव कैतके, आकाश तारडे, संजय तारडे ,महेश तारडे, योगेश तारडे, कैलास मांगूडे ,अण्णासाहेब तारडे ,मोहन तारडे, प्रल्हाद तारडे,बाबासाहेब गोसावी नामदेव कैतके,अरुण मांगुडे यांनी केली आहे.याबाबतचे निवेदन राहुरी तहसीलदार यांना ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button