महाराष्ट्र

उस्मानाबाद जिल्हा अध्यक्षपदी शेळके

कळंब : येथील अमोलआण्णा शेळके यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या उस्मानाबाद जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी शेळके यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे .
        शेळके यांनी तालुकाध्यक्ष असताना केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आल्याची माहिती यावेळी संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी दिली. या निवडीचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी मंत्री शालिनीताई पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील,प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, मराठवाडा अध्यक्ष रघुनाथ भोसले, संघटक मोहन सोनटक्के, कार्याध्यक्ष किरण मेहेत्रे आदींनी अभिनंदन व शुभेच्छा दिल्या आहे.शेळके यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button