महाराष्ट्र
जळगाव जिल्हा अध्यक्षपदी चौधरी
जळगाव : येथील चंद्रकांत लक्ष्मण चौधरी यांची अखिल भारतीय क्रांतीसेना पक्षाच्या जिल्हा प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी चंद्रकांत चौधरी यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे .
या निवडीचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी मंत्री शालिनी पाटील, पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील, प्रदेश सरचिटणीस नितीन देशमुख, शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय तांबे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नंदलाल वसईकर, उत्तर महाराष्ट्र संघटक प्रदीप पवार, खांदेश प्रमुख संदीप सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे. या पदाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सोडविण्यात येतील, असे चौधरी यांनी यावेळी सांगितले.