महाराष्ट्र
नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी लिंगायत
नंदुरबार : येथील चंद्रकांत लिंगायत यांची अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अखिल भारतीय क्रांतीसेनेचे राज्य संपर्क प्रमुख मधुकर म्हसे पाटील यांनी चंद्रकांत लिंगायत यांना नियुक्तीचे पत्र दिले आहे .
चंद्रकांत लिंगायत यांनी केलेल्या कार्याची दखल घेत त्यांची जिल्हाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.या निवडीचे अखिल भारतीय क्रांतीसेनेच्या मार्गदर्शिका माजी मंत्री शालिनीताई पाटील,पक्षप्रमुख संतोष तांबे पाटील,प्रदेश सरचिटणीस नितीनभैय्या देशमुख,शिक्षक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष दत्तात्रय तांबे, उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख नंदलाल वसईकर, खान्देश प्रमुख संदीप सोनवणे आदींनी अभिनंदन केले आहे. चंद्रकांत लिंगायत यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.